Bangladesh Blast News
Bangladesh Blast News  saam tv
देश विदेश

Bangladesh Blast: बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये भीषण स्फोट, 16 जणांचा मृत्यू, शेकडो लोक जखमी

Chandrakant Jagtap

Bangladesh Blast News : बांगलादेशची राजधानी ढाका येथील एका इमारतीत झालेल्या भीषण स्फोटात 16 जणांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक वेळेनुसार दुपारी 4.50 च्या सुमारास हा स्फोट झाला. हा स्फोट एवढा भीषण होता की 100 हून अधिक लोक त्यात जखमी झाले. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्फोटानंतर अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्याचे स्थानिक माध्यमांनी सांगितले. स्फोटानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. स्फोट इतका तीव्र होता की घटनास्थळी बराच वेळ धूर दिसत होता. स्फोटाची माहिती मिळताच स्थानिक अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले.

घटनास्थळी बचाव आणि सुरक्षा कार्य सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी ढाका येथील गर्दीच्या बाजारपेठेत हा स्फोट झाला. स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच स्फोटातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi news)

पोलिसांनी सांगितले की जखमींना ढाका मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांवर रुग्णालयातील आपत्कालीन विभागात उपचार सुरू आहेत. इमारतीच्या तळमजल्यावर सॅनिटरी उत्पादनांची अनेक दुकाने आहेत आणि त्याच्या शेजारी BRAC बँकेची शाखा आहे.

स्फोटामुळे बँकेच्या काचेच्या भिंतींचा चुराडा झाला. तसेच रस्त्याच्या विरुद्ध बाजूला उभ्या असलेल्या बसचेही नुकसान झाले. स्फोटानंतर लगेचच 45 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : पुण्यात विमाननगर परिसरातील सोसायटाला लागली आग

Rahul Gandhi : नरेंद्र मोदींच्या अदानी-अंबानींवरील विधानावर काँग्रेसचा पलटवार; राहुल गांधींनी थेट Video च शेअर केला

Ambulance Scam: राज्यात 10 हजार कोटींचा ॲम्ब्युलन्स घोटाळा? कोर्टानं शिंदे सरकारकडे मागितला खुलासा; काय आहे हे प्रकरण? जाणून घ्या

Chicken Shawarma : शोरमा खाल्ल्याने तरुणाचा गेला बळी, फास्टफूड आरोग्यासाठी किती आणि कसे धोकादायक? तज्ज्ञ म्हणाले...

Avneet Kaur : अवनीत कौरच्या दिलखेचक अदा, फोटो पाहून नजरच हटणार नाही

SCROLL FOR NEXT