Raima Islam shimu  SaamTvNews
देश विदेश

बांग्लादेशी अभिनेत्रीची पतीनेच मित्राच्या मदतीने केली हत्या; मृतदेह गोणीत भरून फेकला!

हत्या केल्यांनतर तिच्या मृतदेहाचे तुकडे दोन गोण्यांमध्ये भरून फेकण्यात आले होते. या २ गोण्यांना ज्या दोऱ्याने शिवण्यात आले होते, पोलिसांना त्याच दोरीचा बंडल रायमाचा पती शेखावत याच्या गाडीजवळ आढळला.

वृत्तसंस्था

बांग्लादेश : बांग्लादेशातील अभिनेत्री रायमा इस्लाम शिमूच्या (Raima Islam shimu) हत्येप्रकरणी पोलिसांनी शेखावत अली नोबल या तिच्या पतीला अटक केली आहे. या हत्येत शेखावत मित्र एसएमवाय फरहाद याने देखील मदत केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे ही हत्या प्लास्टिकच्या दोरीने झाल्याचे उघड झाले आहे. (Raima Islam shimu Murder)

हे देखील पहा :

कोण आहे रायमा इस्लाम शिमू?

बांग्लादेशी अभिनेत्री रायमा इस्लाम शिमूने १९९८ मध्ये 'बार्तामन' चित्रपटातून बांग्लादेशच्या सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. रायमाने आतापर्यंत २५ सिनेमांमध्ये काम केले आहे. ती बांग्लादेश फिल्म आर्टिस्ट असोसिएशनची सहयोगी सदस्य देखील होती. सिनेमांव्यतिरिक्त तिने टीव्ही नाटकांमध्येही अभिनय आणि निर्मिती केली आहे.

बांग्लादेशातील (Bangladesh) 45 वर्षीय अभिनेत्री रायमा इस्लाम शिमू नुकतीच बेपत्ता झाली होती. दरम्यान, बांग्लादेशची राजधानी ढाकापासून (Dhaka) काही अंतरावर हजरतपूर पुलाजवळील केरानीगंज परिसरात रायमा इस्लाम शिमूचा मृतदेह दोन गोण्यांमध्ये तुकडे करून टाकला होता. मंगळवारी स्थानिक नागरिकांना हा मृतदेह दिसून आल्यानंत केरनीगंज मॉडल पोलिस स्टेशनला ही माहिती दिली. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. यापूर्वी कलाबागन पोलिस ठाण्यात शेखावत यानेच आपली पत्नी रायमा इस्लाम शिमू हरवल्याची तक्रार दाखल केली होती.

मात्र, या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून ढाका पोलिसांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. पोलिसांनी (Police) सांगितले की, रायमा इस्लामचा पती आणि त्याच्या मित्राला अटक करण्यात आली आहे. ढाका जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक मारुफ हुसैन यांनी सांगितले की, हत्येचे कारण कौटुंबिक कलह आहे. याप्रकरणी त्यांनी रायमाचा पती आणि त्याच्या मित्राची चौकशी केली. त्यानंतर मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे तिच्या पतीला अटक (Arrest) करण्यात आली.

प्लॅस्टिकच्या दोरीने खुनाचे धागेदोरे सापडले!

रायमाच्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलीस तातडीने अभिनेत्री रायमाच्या घरी पोहोचले.

या हत्या प्रकरणात प्लास्टिकची दोरी हा महत्त्वाचा पुरावा ठरला. रायमाची अत्यंत क्रूरतापुर्वक हत्या (Murder) केल्यांनतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून हे तुकडे दोन गोण्यांमध्ये भरून फेकण्यात आले होते. दोन गोण्यांना प्लॅस्टिकच्या ज्या दोऱ्याने शिवण्यात आले होते, त्याच दोरीचा बंडल रायमाचा पती शेखावत याच्या गाडीजवळ आढळून आल्याने पोलिसांचा संशय बळावला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी 16 जानेवारीला ही हत्या झाली. सकाळी 7 ते 8 च्या दरम्यान अभिनेत्रीच्या पतीने तिचा गळा आवळून खून केला. यानंतर पतीने मित्राला बोलावून मृतदेहाचे तुकडे करून हे तुकडे प्लॅस्टिकच्या गोणीमध्ये भरले आणि गोणी दोरीच्या सहाय्याने शिवून घेतली. आधी त्यांनी मृतदेहाची विल्हेवाट ह्या गोण्या मीरपूरला नेल्या. मात्र, तिथे योग्य जागा न मिळाल्यामुळे त्यांनी हा मृतदेह (Deathbody) परत घरी आणला. त्याच दिवशी सायंकाळी साडेनऊ वाजता त्यांनी हा मृतदेह हजरतपूर पुलाजवळ फेकून दिला.

तत्पूर्वी मृतदेहाची दुर्गंधी दूर करण्यासाठी त्यांनी त्यावर ब्लिचिंग पावडर शिंपडली होती. मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर त्यांनी कार देखील धुतली होती. या सर्व छोट्या मोठ्या गोष्टी पोलिसांनी बारकाईने पाहिल्यानंतर, पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी शेखावत यांने पत्नीचा खून केल्याची बाब मान्य केली. पोलिसांनी या गुन्ह्यात त्याच्या मित्रालाही कटात सहभागी असल्याबद्दल अटक केली असून शेखावत याला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी मद्यपी आणि बेरोजगार आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT