Bangalore Mall 
देश विदेश

Bangalore Mall: घातली लुंगी,नाकारली एण्ट्री; नंतर सरकारनं वाजवली मॉलची पुंगी

Tanmay Tillu

कोणी कसं राहावं,काय कपडे घालावे हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो,यावरुन अनेकदा वादही होतात. मात्र दक्षिण भारतीय संस्कृतीचा भाग असलेली लुंगी घातली म्हणून मॉलमध्ये प्रवेश नाकारल्याची धक्कादायक घटना घडलीये.

फकिराप्पा या वृद्धाला पारंपरिक दक्षिण भारतीय पोशाख असलेली लुंगी घातल्यानं मॉलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. फकीरप्पा आणि त्यांचा मुलगा मॉलमध्ये चित्रपट पाहण्यासाठी आले होते. मात्र, प्रवेशद्वारावरच मॉलच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांची अडवणूक केली. या बाप-लेकाकडे त्यांची प्री-बुक केलेली चित्रपटाची तिकिटं असूनही त्यांना मॉलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला.

फकीराप्पांना कपडे बदलून येण्यास सांगण्यात आलं. सुरक्षा रक्षकानं त्यांना शेवटपर्यंत आतमध्ये जाऊ दिलं नाही. फकिराप्पांच्या मुलानं यासंदर्भातील व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओ व्हायरल झाला आणि नेटकऱ्यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या. हा सर्व संतापजनक प्रकार घडला तो बंगळुरूतल्या जीटी मॉलमध्ये.

प्रकाराचं गांभीर्य लक्षात आल्यानंतर मॉलच्या कर्मचाऱ्यांनी या वृद्धाचा सन्मान केला आणि घडलेल्या प्रकाराबाबत माफीही मागितली. मात्र प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही. या संतापजनक प्रकरणाची कर्नाटकातील अनेक संघटना आक्रमक झाल्या. त्यानंतर कर्नाटक सरकारने मॉल प्रशासनाला दणका दिलाय.

या संतापजनक प्रकरणाची कर्नाटकातील अनेक संघटना आक्रमक झाल्या. त्यानंतर कर्नाटक सरकारने मॉल प्रशासनाला दणका दिलाय. 7 दिवस मॉल बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लुंगी हा दाक्षिणात्य पोशाखाचा अविभाज्य भाग आहे. दाक्षिणात्य पोशाखात लुंगीला वेगळं महत्त्व आहे. दक्षिणेतील अनेक नेते,मंत्री हेही संसदेत लुंगीवर आल्याचं देशानं पाहिलंय. या लुंगी प्रकरणामुळे मात्र मोठ्या शहरांमध्ये पारंपरिक पोषाखाचा द्वेष करणा-या मॉल, हॉटेल्सची पुंगी वाजलीय एवढं मात्र नक्की.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रूपाली चाकणकर यांच्याप्रती केलेली कौतुकाची पोस्ट अजित पवारांनी केली डिलीट

Sanjay Raut Press Conference : जागा वाटपावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; सांगितले मविआच्या जागांचे सूत्र

Gold Silver Price: सोनं ७८००० वर पोहचलं; दिवाळीआधीच सोने-चांदीला झळाळी

Dustbin Scam : नवी मुंबई मनपामध्ये डस्टबिन घोटाळा; काम न करता जुने फोटो दाखवून लाखोंचा भ्रष्टाचार

Karmayogi Abasaheb: सोलापुरात ५४ वर्षे आमदार, लोकांसाठी झटला, सर्वसामान्य नेत्याची कथा मोठ्या पडद्यावर! चित्रपटाचा ट्रेलर लाँच

SCROLL FOR NEXT