Senior BJP leader and former Rajya Sabha MP Balbir Punj, remembered for his sharp intellect and contributions to Indian political thought. saam tv
देश विदेश

भाजपचा अनुभवी चेहरा हरपला; PM मोदींसह अनेक दिग्गज नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली, राजकीय वर्तुळात शोककळा

Senior BJP Leader Balbir Punj Dies: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यसभा खासदार बलबीर पुंज यांचे निधन झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Omkar Sonawane

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यसभा खासदार बलवीर पुंज यांचे शनिवारी निधन झाले आहे. ते आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जात होते. नोएडा येथील एका रुग्णालयात त्यांचे निधन झाले, काही दिवसापूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर 12.30 वाजता दिल्लीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

पंतप्रधान मोदींनी केला शोक व्यक्त

भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी राज्यसभा खासदार आणि पत्रकार बलबीर पुंज यांच्या निधनाने देशभरात शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि इतर अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. सोशल मीडियावर त्यांचा फोटो शेअर करत त्यांचे निधन ही देशाची कधीही भरून न येणारी हानी आहे.

एका मोठ्या विचारवंताचा अंत

बलबीर पुंज हे केवळ एक राजकारणीच नव्हते तंत्र एक प्रगाढ विचारवंत आणि प्रभावशाली लेखकही होते. ते भाजपच्या बौद्धिक शाखेशी संबंधित होते आणि पक्षाची वैचारिक दिशा ठरवण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. राष्ट्रीय मुद्यांवर स्पष्ट आणि ठाम मते असणारी व्यक्ती म्हणून ते ओळखले जात असे. बलबीर पुंज यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात पत्रकारितेतून केली. त्यांनी 1971 मध्ये 'द मदरलँड' वृत्तपत्रातून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर 1974 मध्ये ते फायनान्शियल एक्स्प्रेसमध्ये रुजू झाले. त्या ठिकाणी त्यांनी जवळपास 20 वर्षे काम केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वारकरी संप्रदायातील घुसखोरीचा वाद पेटला, राष्ट्रवादीच्या विकास लवांडेंवर शाईफेक

सुप्रिया सुळे यांच्या कारचा अपघात; मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर भरधाव वाहनाने दिली धडक

अनैतिक संबंधांचा भयंकर शेवट, वहिनीनं दीराला ऊसाच्या शेतात बोलावलं; रागाच्या भरात गुप्तांग कापलं, धक्कादायक कारण

Mukhyamantri Mahila Rojgar Yojana : 1.81 कोटी महिलांच्या बँक खात्यात कधी पैसे येणार? सरकारने दिली महत्त्वाची अपडेट

Maharashtra News Live Update: विकास लवांडे आणि शरद पवारांची फोनवरून चर्चा

SCROLL FOR NEXT