लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला बोलताना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान मोदी यांची नाव न घेता लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी याचा बालकबुद्धी म्हणून उल्लेख केला आहे. ते म्हणाले की, काँग्रेस पक्ष आपल्या 99 जागांना बंपर विजय म्हणत आहे, मात्र हा त्यांचा सर्वात मोठा पराभव आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेस आणि त्यांची यंत्रणा आजकाल मुलांचे मनोरंजन करण्यात व्यस्त आहे.
संसदेत एक किस्सा सांगताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "मला एक घटना आठवते. एक मुलगा 99 गुण मिळवून अभिमानाने फिरत होता आणि सर्वांना दाखवत होता, की त्याला किती गुण मिळाले आहेत. लोक 99 ऐकल्यावर त्याची स्तुतीही करायचे. त्याला प्रोत्साहन देत होते. याचदरम्यान, मुलाच्या शिक्षकाने त्याला सांगितलं की, तू कोणत्या गोष्टीचा आनंद साजरा करतोय? हे 100 पैकी 99 गुण नाहीत, तर तुला 543 पैकी 99 गुण मिळाले आहेत. आता त्या बालबुद्धीला कोण समजावणार की तू अपयशाचा विश्वविक्रम केला आहेस. "
ते म्हणाले की, ''त्यांच्या वक्तृत्वाने शोले चित्रपटालाही मागे सोडले आहे. शोले चित्रपटातील मौसी जी तुम्हाला आठवत असतील. आम्ही तिसऱ्यांदा हरलो, पण काकू हा नैतिक विजय आहे, नाही का? त्या म्हणाल्या, 13 राज्यात जिरो जागा आल्या आहेत? अहो काकू, मग काय झालं, होरो तर आहे ना?''
पंतप्रधान मोदी म्हणाले, 1984 पासून आतापर्यंत 10 निवडणुका झाल्या आणि काँग्रेसला 250 चा आकडा गाठता आलेला नाही. यावेळी ते 99 च्या जाळ्यात अडकले आहेत.
काँग्रेसवर हल्लाबोल करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेस देशात अराजकता पसरवण्यात व्यस्त आहे. राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत ते म्हणाले की, काल सभागृहात बालिशपणा पाहायला मिळाला. त्याच्यावर संस्थांबाबत खोटे बोलत असल्याचा आरोप आहे. सावरकरांचा अवमान केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. हा बालबुद्धी संसदेत डोळे मारतो. सभागृहात मिठी मारतो. सहानुभूती मिळविण्यासाठी तो नवीन नाटक करत असतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.