PM Modi's Lok Sabha Speech Saam Tv
देश विदेश

PM Modi Speech: बालकबुद्धी, भ्रष्टाचार, इंडिया आघाडी; PM मोदींच्या भाषणातील १० प्रमुख मुद्दे

PM Modi's Lok Sabha Speech: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत भाषण करताना विरोधी पक्षांवर हल्लाबोल केला आहे. त्यांच्या भाषणातील १० प्रमुख मुद्दे जाणून घेऊ...

Satish Kengar

संसदेत मंगळवारच्या दिवसाची सुरुवात खूप गोंधळाने झाली. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलताना विरोधी पक्षांवर हल्लाबोल केला आहे. आज संसदेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर अनेक सन्माननीय सदस्यांनी आपली मते व्यक्त केली. विशेषत: पहिल्यांदाच ज्यांनी संसदेच्या नियमांचे पालन करून आपले मत व्यक्त केले आणि सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य म्हणून वागले. त्यांनी सभागृहाची प्रतिष्ठा वाढवली आहे. ही जगातील सर्वात मोठी निवडणूक असल्याचे देशाने जगाला दाखवून दिले. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांचा बालकबुद्धी म्हणून उल्लेख केला. दरम्यान, संसदेतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील १० ठळक मुद्दे जाणून घेऊ...

  • काँग्रेसवर टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, सतत खोटे बोलूनही निवडणुकीत पराभूत झालेल्या काही लोकांची व्यथा मी समजू शकतो. भारतीय जनतेने त्यांना सलग तिसऱ्यांदा सेवेची संधी दिली आहे.

  • देशाच्या इतिहासातील ही अत्यंत महत्त्वाची घटना आहे. जनतेने आमचा १० वर्षांचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिला आहे. देशाने तुष्टीकरणाचे राजकारण आणि प्रशासनाचे मॉडेल दीर्घकाळ पाहिले आहे.

  • भ्रष्टाचाराविरुद्धच्या आमच्या लढ्यात, आम्हाला जनतेचा भक्कम पाठिंबा मिळाला आहे, जो पूर्णपणे 'इंडिया फर्स्ट' तत्त्वावर आधारित आहे.

  • मी आपल्या देशवासियांना आश्वासन देऊ इच्छितो की, विकसित भारत घडवण्याचा आमचा संकल्प पूर्ण करण्यात आम्ही कोणतीही कमतरता सोडणार नाही. आम्ही सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू.

  • २०१४ मध्ये देश नैराश्यात होते, लोकांनी आम्हाला निवडून दिले आणि परिवर्तनाचे युग सुरू झाले.

  • भ्रष्टाचाराचा एक काळ असा होता की, दिल्लीतून पाठवलेल्या एक रुपयापैकी फक्त १५ पैसेच त्याच्या गंतव्यस्थानी पोहोचल्याचे उघडपणे मान्य करण्यात आले होते. उर्वरित ८५ पैसे घोटाळ्यात गेले.

  • देशातील जनतेने २०२४ च्या निवडणुकीत काँग्रेसला जनादेश दिला आहे, तुम्ही तिथे बसा, विरोधी पक्षात बसा आणि तर्क संपले की ओरडत राहा.

  • कलम ३७० च्या काळात लष्करावर दगडफेक झाली आणि निराशेचे वातावरण निर्माण झाले. आज कलम ३७० रद्द केल्यानंतर दगडफेक थांबली आहे. लोक भारताची राज्यघटना, ध्वज आणि लोकशाहीवर विश्वास ठेवून निवडणुकीत भाग घेत आहेत.

  • विरोधकांवर तोंडसुख घेत ते म्हणाले, काँग्रेस आणि तिची परिसंस्था लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत की, त्यांनी आमचा पराभव केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Exit Poll : धीरज देशमुख पुन्हा आमदार होणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?

Maharashtra Exit Poll: धामणगाव मतदारसंघातून विरेंद्र जगताप होणार आमदार? पाहा Exit Poll

Nevasa Exit Poll: नेवासा मतदारसंघात कोण होणार आमदार? Exit पोलचा अंदाज काय

Exit Poll Maharashtra : राहुरी विधानसभा मतदारसंघातून प्राजक्त तनपुरे होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Polls : सिंदखेड राजामध्ये राजेंद्र शिंगणेंची जादू पुन्हा चालणार का? एक्झिट पोल काय सांगतो?

SCROLL FOR NEXT