Raipur’s Magneto Mall after vandalism during the statewide bandh. saam tv
देश विदेश

Bajrang Dal Vandalism Mall: बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा राडा; धर्म विचारून रायपुरच्या मॅग्नेटो मॉलमध्ये तोडफोड

Bajrang Dal Vandalism Magneto Mall: छत्तीसगड बंद दरम्यान रायपूरच्या मॅग्नेटो मॉलमध्ये तोडफोड करण्यात आलीय. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सजावटीच्या साहित्यांची तोडफोड केलीय.

Bharat Jadhav

  • छत्तीसगड बंददरम्यान रायपूरमध्ये तोडफोडीची घटना

  • मॅग्नेटो मॉलमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा राडा

  • सजावटीसह मालमत्तेचे अंदाजे ५ लाखांचे नुकसान

छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात झालेल्या हिंसाचार आणि बेकायदेशीर धर्मांतराच्या निषेधार्थ राज्यव्यापी बंद पाळण्यात आला. रायपूर, कांकेर, दुर्ग आणि बिलासपूरसह संपूर्ण राज्यात बाजारपेठा आणि दुकाने बंद होत्या. त्याचवेळी रायमपूरमधील मॅग्नेटो मॉलमध्ये बजरंग दलाने तुफान तोडफोड केली. येथे क्रिसमस साजरा करण्यासाठी तयारी करण्यात आली होती. पूर्ण मॉल सजवण्यात आला होता. त्यावेळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड करत सजावटीची नासधूस केली.

या घटनेनंतर तेलीबांधा पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. रायपूर बंदला पाठिंबा द्या, दुकान बंद ठेवा असं म्हणत काही लोकांनी तोडफोड केल्याची माहिती तेलीबांधा पोलिस ठाण्याचे प्रभारी अविनाश सिंह यांनी दिली. मॉल व्यवस्थापनाच्या म्हणण्यानुसार, तोडफोडीमुळे अंदाजे ५ लाख रुपयांचे नुकसान झालंय. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. किती रुपयांचे नुकसान झालंय याची माहिती घेतली जात आहे.

दरम्यान मॉलच्या व्यवस्थापकांनी पोलीस स्टेशनमध्ये कोणत्याच प्रकारची तक्रार केली नाहीये. तक्रार नोंदवल्यानंतर संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाणार, असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिलीय. दरम्यान दुसऱ्या दिवशी सर्व आदिवासी समाजाच्या कार्यकर्त्यांनी आंतरराज्य बस स्थानकावरील बस वाहतूक रोखली.

पेट्रोल पंप बंद असल्याने अमानका परिसरातील परिस्थितीही तणावपूर्ण बनलीय. कांकेर जिल्ह्यातील आमाबेडा येथे झालेल्या हिंसाचार आणि धार्मिक धर्मांतराच्या निषेधार्थ बुधवारी अनेक सामाजिक संघटनांनी छत्तीसगड बंदचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यभरात बंदचे परिणाम दिसल. रायपूर, दुर्ग,स आणि जगदलपूरमधील शाळा, दुकाने, अनेक व्यापारी संस्थादेखील बंद होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नांदेड हादरलं! कुटुंबातील चौघांचा मृत्यू; २ तरुण्याबांड पोरांची रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या, घरी आई-बापानं जीवन संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

Bangladesh: बांगलादेशात आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, बेदम मारहाण करून जीव घेतला

Pune Corporation Election: जागा वाटपावरून महायुतीचं बिनसलं, शिवसेना युतीमधून बाहेर पडणार? शिंदे गटाचा अल्टिमेटम

शिंदेंच्या यशानं, पवारांना टेन्शन! सेना - राष्ट्रवादीत ईर्ष्येची लढाई, अस्वस्थ दादा का भडकले मंत्र्यांवर?

मशालीला कॉग्रेसचा हात? ठाकरेसेनेला कॉंग्रेसचा पाठिंबा

SCROLL FOR NEXT