Baba Vanga Prediction Saam Tv
देश विदेश

Baba Vanga Predictions 2025 : कोण उद्ध्वस्त, कोण उदयास येणार? बाबा वेंगांची 2025 ची भविष्यवाणी खरी ठरणार? VIDEO

baba vanga 2025 : नवीन वर्ष मोठ्या आशा, उमेद आणि नवीन स्वप्नांना कवेत घेऊन आलं आहे. 2025 च्या पोटात काय दडलंय ? याची जगात सर्वांनाच उत्सुकता असताना बाबा वेंगांच्या भविष्यवाणीने अनेकांची झोप उडाली आहे. पाहूया एक रिपोर्ट 2025 बाबत काय भाकित केलंय.

Girish Nikam

नवीन वर्ष सर्वांसाठी चांगलं जावं यासाठी प्रत्येकजण त्यांच्या परीने प्रयत्न करणार आहे. नवीन वर्षाच्या पोटात काय दडलंय याची सर्वांनाच उत्सुकता आहे. मात्र २०२५ वर्षाबाबत काही भीतीदायक भविष्यवाण्या करण्यात आल्या आहेत. बाबा वेंगा आणि फ्रेंचचे नॉस्ट्राडेमस त्यांच्या अचूक भविष्यवाणीसाठी ओळखले जातात. त्यांनी माणसांशी एलियन संपर्क, व्लादिमीर पुतिन यांच्यावर हत्येचा प्रयत्न, दहशतवादी हल्ले यांच्यासह अनेक भविष्यवाणी केल्या आहेत.

बाबा वेंगा यांनी दावा केला आहे, की जगाचा अंत 2025 मध्ये सुरू होईल. या विनाशाची सुरुवात युरोपपासून होईल, असा त्यांनी वक्तव्य केलं होतं.

बाबा वेंगाची अचूक भविष्यवाणी

बाबा वेंगा दृष्टीहीन होते. ते बल्गेरियाचे रहिवासी होते. 1996 मध्ये त्यांचं निधन झाले. 9/11 हल्ला, राजकुमारी डायनाचा मृत्यू, चेरनोबिल अणूप्रकल्प दुर्घटना, स्टॅलिनची मृत्यू, सोविएत संघाचे विभाजन, दुसरे महायुद्ध, 2004 मधील त्सुनामी या सारख्या महत्त्वाच्या जागतिक घटनांचं भाकीत बाबा वेंगा यांनी केलं होतं.

एक विनाशकारी युद्ध युरोपला उद्ध्वस्त करणार आहे. या युद्धामुळे खंड नष्ट होणार आहे. 2025 हे वर्ष ब्रिटनसाठी अशुभ असल्याचं भाकित आहे. रशिया देश केवळ टिकणार नाही तर जगावर वर्चस्व गाजवेल. युक्रेनविरुद्ध सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर हा अंदाज अधिकच खरा ठरणार की काय असा प्रश्न आता निर्माण होतोय. याशिवाय त्यांनी अनेक नैसर्गिक आपत्तींचे भाकीत केलं. यामध्ये अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील भूकंप आणि ज्वालामुखीचा उद्रेक यांचा समावेश आहे.

मोठ्या साथीच्या रोगांबद्दलही इशारा दिला आहे. भविष्यवाणी काही असली तरी आपण सकारात्मक राहणं गरजेचे आहे. मोठी आशा ठेऊन, आनंदानं आपण 2025 चे स्वागत केले पाहिजे. आणि काही संकल्पही करायला हवेत. एव्हढं मात्र खरं...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आपच्या 7 खासदारांना दिलासा, भाजप प्रवेशाला मंजुरी

Garam Pani Kund In Mandla History: बापरे चमत्कारच! बाराही महिने गरम पाणी वाहणारं हे कुंड नेमकं आहे तरी कुठे?

Pune : पुण्यातील नामंकित कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची रॅगिंग; ५ जणांवर गुन्हा

मुंबईहून १६६ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड; भोपाळमध्ये केलं एमर्जन्सी लँडिग

लग्नाचं वचन देऊन Bigg Boss फेम अभिनेत्रीने 9 कोटींना लुटले; NRI तरुणाचा गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT