Threat to Blast Ram Mandir in Ayodhya Saam Digital
देश विदेश

Ayodhya: 'मंदिराची सुरक्षा वाढवा, अन्यथा...'; राम मंदिराला बॉम्बने उडवून देण्याची धमकी, सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

Security Tightened in Ayodhya After Threatening Email to Ram Temple Trust: अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्याने खळबळ उडाली आहे.

Bhagyashree Kamble

अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराला बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. राम मंदिर ट्रस्टसह उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी रात्रीच्या सुमारास ई-मेल प्राप्त झाला असून, त्यामध्ये थेट मंदिरावर हल्ल्याचा इशारा देण्यात आला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच अयोध्येच्या सायबर पोलिस ठाण्यात तात्काळ तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सोमवारी रात्री राम रामजन्मभूमी ट्रस्टच्या ई मेलवर धमकीचा मेल आला होता. या ई मेलमध्ये 'मंदिराची सुरक्षा वाढवा' असे लिहिण्यात आले होते. या प्रकरणी राम मंदिर ट्रस्टने एफआयआर दाखल केली.

या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्यात आली असता, हा ई मेल तामिळनाडूतून पाठवण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. या मेलची चौकशी सायबर सेल करत असून, त्यामागील आयपी अॅड्रेस आणि लोकेशन शोधण्याचं काम सुरू आहे.

अयोध्यासह अनेक जिल्ह्यांना धमकी

हा धमकीचा ई मेल फक्त अयोध्येला पाठण्यात आला नसून, बाराबंकी, चंदौली आणि इतर काही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आला आहे. या धमकीच्या ई मेलमुळे उत्तर प्रदेशातील संपूर्ण सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत.

सीआरपीएफ आणि युपीएसएसएफच्या तुकड्यांचा सुरक्षा बंदोबस्तात वाढ

अयोध्येतील मंदिर परिसरात सीआरपीएफ आणि युपीएसएसएफच्या अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मंदिर परिसराची कसून चौकशी करण्यात येत आहे. तसेच अयोध्येतील राम मंदिरात प्रवेशावर देखील कडक नियंत्रण ठेवण्यात आले आहे.

पूर्वीही मिळाल्या धमक्या

अयोध्येतील राम मंदिराला यापूर्वीही अनेकवेळा धमक्या मिळाल्या आहेत. सप्टेंबर २०२४ मध्ये एका तरूणाने सोशल मीडियावर धमकी दिली होती. त्या तरूणाचा तपास करून पोलिसांनी त्याला बिहारमधून अटक करण्यात आली होती. दरम्यान प्रशासनाने भाविकांना अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची शेवटची आरती संपन्न

ITR Filling: आयटीआर फाइल करण्याची डेडलाइन वाढण्याची शक्यता, आतापर्यंत फक्त ४.५६ कोटी करदात्यांनी केलाय अर्ज

Ganesh Visarjan 2025: बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूकीत पायांची काळजी कशी घ्याल? हे उपाय करतील तुमची मदत

Baaghi 4 OTT Release : जबरदस्त ॲक्शन अन् रोमान्सचा धमाका, टायगर श्रॉफचा 'बागी ४' कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार?

Ganpati Visarjan : पुण्यात गणपती विसर्जनावेळी दुर्घटना, मिरवणुकीदरम्यान दोन जणांना विजेचा शॉक

SCROLL FOR NEXT