Ayodhya News Saam Tv
देश विदेश

Ayodhya News: अयोध्येत भक्तांच्या श्रद्धेपुढे थंडीही नरमली, ८ अंश तापमानातही रामभक्तांचा अनोखा उत्साह

Ayodhya Weather Today: आज अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होतेय. भक्तांनी एकच गर्दी केली आहे. अयोध्येतील तापमान ८ अंश आहे, तरी भक्तांचा अनोखा जल्लोष पाहायला मिळतोय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Ram Mandir Pran Pratishtha Mausam

अयोध्येत (Ayodhya ) आज सकाळी ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील काही तासांमध्ये तापमान आणि दृश्यमानतेत किंचित घट होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अयोध्येत आज तीव्र थंडीची शक्यता आहे. (latest ram mandir update)

अनेक वर्षांनंतर अखेर आज श्री रामप्रभु त्यांच्या भव्य आणि दिव्य महालात (ram mandir) विराजमान होणार आहेत. अयोध्येतील हवामानही रामप्रभुचं स्वागत करताना दिसत आहे. अयोध्येत रामनगरीमध्ये आज धुके दिसत नाही, सकाळी 6 वाजता येथे 1200 मीटर दृश्यता नोंदवण्यात आली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अयोध्येतील हवामान

सकाळी ६ वाजता अयोध्येत (Ayodhya weather) ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील काही तासांमध्ये तापमान आणि दृश्यमानतेत किंचित घट अपेक्षित आहे. यानंतर पुन्हा सुधारणा होऊ शकते. मात्र, हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार अयोध्येत आज थंडी असणापर आहे. आज किमान तापमान 7 आणि कमाल तापमान 16 अंश सेल्सिअस राहील.

अयोध्येत (Ayodhya) उद्या म्हणजेच मंगळवारीही थंडी राहणार आहे. दिवसाचे तापमान 15-17 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे. दृश्यमानता 100 मीटरपर्यंत कमी होऊ शकते. दुपारी 12 च्या सुमारास प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान 1000 मीटर ते 1500 मीटर दरम्यान दृश्यमानता अपेक्षित आहे.

अयोध्येत उत्सवाचं वातावरण

आज रामलल्लाच्या मूर्तीचा अभिषेक (Ram Mandir Pran Pratishtha) करण्याचा विधी पीएम मोदी आणि सीएम योगी यांच्यासह संत समुदाय आणि विशेष लोकांच्या उपस्थितीत पूर्ण होणार आहे. हजारो क्विंटल फुलांनी अयोध्या नगरी (Ayodhya) अगदी नवरीसारखी सजवण्यात आली आहे. अवधपुरीत उत्सवाचं वातावरण आहे. सूर्यवंश राजधानी अयोध्या धामसह देशभरातील मंदिरांमध्ये राम संकीर्तन आणि राम चरित मानसाचे पठण केलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

Maharashtra Live News Update: बोरिवली पूर्वेतील एसआरए प्रकल्पात भीषण आग

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

Badlapur : बदलापुरातील भोज धरणातील बंधाऱ्यावर तरुणाचा जीवाशी खेळ | VIDEO

SCROLL FOR NEXT