Security under scrutiny at Ayodhya Ram Temple after SIT reveals repeated donation thefts. saam tv
देश विदेश

राम मंदिरात 40 दिवसांत 70 वेळा चोरी, SITच्या अहवालात धक्कादायक खुलासे, बड्या धेंड्यांना वाचवण्याचा डाव?

Ayodhya Ram Temple Theft Scandal: अयोध्येत राम मंदिरातील चोरी प्रकरणाच्या तपासात धक्कादायक खुलासे होतायेत. SITच्या अहवालात राम मंदिरात 40 दिवसात 70 वेळा चोरी झाल्याचं उघड झालंय. मंदिरातील सुरक्षा नियमांची कशी ऐशीतैशी झाली ? कोणत्या त्रृटींमुळे चोरांनी भक्तांच्या देणगीवर डल्ला मारला ? पाहूया एक खास रिपोर्ट..

Girish Nikam

राम मंदिरातील दान चोरी प्रकरणात एसआयटीचा प्राथमिक अहवाल प्रसिद्ध झालाय. त्यात असे काही खुलासे आहेत की ज्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. 27 एप्रिल 2026 ते 5 जून 2026 या 40 दिवसांच्या कालावधीत 70 वेळा चोरी झाल्याचे उघड झालंय. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी नोटांचे बंडल काढताना दिसलेत. दान पेटीतल्या नोटांच्या मोजणीशी संबंधित अनेक सुरक्षा नियमांचे पालन न केल्यामुळे ही चोरी शक्य झाली. नेमक्या कोणत्या त्रृटी होत्या ते पाहूया..

राम मंदिरात या त्रुटींमुळे चोरी

-6 फेब्रुवारी 2025 रोजी ठरवलेले कठोर नियम शिथिल केले

-दानपेट्यांची स्वतंत्र मोजणी आणि नोंदणी योग्य प्रकारे होत नव्हती

-सीसीटीव्ही कॅमेरेंचं काटेकोर निरीक्षण केले नाही

- मोजणी कक्षात प्रवेशाच्या नियमांचे पालन झालं नाही

- कर्मचाऱ्यांची झडती घेतली जात नव्हती

- कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक वस्तूंची तपासणी होत नव्हती

- ड्रेस कोडची अंमलबजावणी झाली नाही

एसआयटीच्या अहवालानुसार आरोपींनी याच त्रुटींचा फायदा घेऊन दान चोरले. देशभरातून झालेल्या टीकेनंतर आणि विरोधरांनी रान उठवल्यानंतर श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय आणि विश्वस्त डॉ. अनिल मिश्रा यांनी आपला पदाचा राजीनामा दिला असला तरी त्यांच्या निष्काळजीपणावर बोट ठेवलं जातंय. मिश्रा यांनी आर्थिक जबाबदाऱ्यांमध्ये कामचुकारपणा केल्याचं आढळलं आहे. ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी चंपत राय यांच्यावर निशाणा साधलाय.

खरतर स्वामी गोविंददेव गिरी महाराज कोषाध्यक्ष असूनही राम मंदिरात फारसे येत नव्हते. ट्रस्टचे कोषाध्यक्ष असूनही ते आर्थिक कारभाराकडे दुर्लक्ष का करत होते? असा आरोप होतोय. आता एसआयटीने आठ जणांना अटक केली असली तरी यातल्या बड्या धेंड्यावर कारवाई होणार का? की असाच राम भरोसे कारभार चालणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शरद पवार सत्तेत सामील होणार? राष्ट्रवादीच्या बैठकीत काय घडलं?

Ice Facial Benefits : बर्फानं फक्त १० सकेंद करा मसाज, महिनाभरात चेहरा काचेसारखा चमकेल, आईस फेशिअलचे ७ फायदे पाहाच

Modern Mangalsutra Designs: लाडक्या बायकोसाठी खरेदी करा मॉडर्न मंगळसूत्र; ‘हे’ ५ डिझाईन्स पाहून ती नक्की होईल खूश!

विश्वासाने दिले १.२० कोटी, बॅग उघडताच कागदी पुड्या; राजस्थानात आवळल्या आरोपीच्या मुसक्या

Maharashtra News Live Update: यवतमाळच्या टाकळी धरणात बुडून तीन तरुणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT