Manasvi Choudhary
आजकालच्या फॅशननुसार महिलांना पारंपरिक दागिन्यांमध्येही मॉडर्न आणि ट्रेंडी लूक आवडतो. महिला डेलीवेअरसाठी देखील युनिक डिझाईन्सचे मंगळसूत्र निवडतात.
तुम्हालाही पत्नीसाठी मंगळसूत्र खरेदी करायचं असेल तर तुम्ही खालील 5 लेटेस्ट मॉडर्न मंगळसूत्राचे पॅटर्न्स पाहून घ्या.
कस्टमाईज चैन मंगळसूत्र हे सध्या ट्रेंडमध्ये आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या किंवा पती-पत्नीच्या नावाचे पहिले अक्षर, लग्न तारीख बनवून घेऊ शकता.
सिंपल आणि सोबर डिझाईन्स आवडत असतील, तर हलक्या वजनाची काळ्या मोत्यांची चेन आणि त्यावर आकर्षक डिझाईनचे छोटेसे सोन्याचे पेंडंट असलेले मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता.
प्रेमाचे प्रतीक असणारे हार्ट शेपचे पेंडंट तुम्ही मंगळसूत्रामध्ये निवडू शकता. सोन्याच्या डिझाईन्समध्ये तुम्ही हे पॅटर्न्स निवडू शकता.
काळ्या मण्यांच्या बारीक चैनमध्ये मध्यभागी एक किंवा एकापेक्षा जास्त मोत्यांचे पेंडंट असणारे हे मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता.
तुम्हाला जास्त हेवी दागिने आवडत नसतील तर तुम्ही मिनिमलिस्ट किंवा अत्यंत साधी काळ्या मोत्यांची चेन असणारे मंगळसूत्र निवडू शकता.