शरद पवार सत्तेत सामील होणार? राष्ट्रवादीच्या बैठकीत काय घडलं?

Sharad Pawar Rules Out NDA Alliance After Key NCP-SP Meeting: पवार- मोदींच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात पवार एनडीएसोबत जाणार असल्याची चर्चा रंगली होती...मात्र शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या बैठकीत एनडीएसोबत जाण्याबद्दल ठोस भूमिका घेतलीय.. पवार नेमकं काय म्हणाले? राष्ट्रवादीच्या बैठकीत नेमकं काय घडलं...पाहूयात या रिपोर्टमधून...
Sharad Pawar latest statement on joining NDA
Sharad Pawar latest statement on joining NDAsaam tv
Published On

शरद पवारांची राष्ट्रवादी एऩडीएसोबत जाणार का? असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सातत्यानं चर्चेला येत येतोय. त्याला कारण होतं.. शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची घेतलेली भेट... तसचं पवारांच्या राष्ट्रवादीच्या आठ खासदारांच्या शिष्टमंडळानं पंतप्रधानांची घेतलेली भेटही एनडीएतील प्रवेशाच्या चर्चांना कारणीभूत ठरत होती...मात्र आता स्वत: शरद पवारांनी या चर्चांना पूर्णविराम दिलाय. पक्षाच्या जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत पवार नेमकं काय म्हणाले ऐका...

शरद पवार काय म्हणाले?

मुंबईत जिल्हाध्यक्षांची 2 दिवसीय बैठक पार पडली

विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांचा या बैठकीत पवारांनी आढावा घेतला

बैठकीत पक्ष NDAसोबत जाणार का? असा सवाल काही जिल्हाध्यक्षांनी पवारांना केला

मात्र आपण विरोधातच आहोत, कुणीही संभ्रमात राहू नये असं म्हणत पवारांनी चर्चांना पूर्णविराम दिलाय...

सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर रस्त्यावरचीही लढाई लढायची आहे,असं आदेशही पवारांनी जिल्हाध्यक्षांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...

दरम्यान पवारांनी केलेल्या या विधानावर खासदार सुप्रिया सुळेंनी थेट प्रतिक्रिया देण्यास टाळलयं..दुसरीकडे पवारांच्या NDA प्रवेशाबद्दल भाजप संभ्रम निर्माण करत असल्याचं आणि पवार मविआसोबतच राहणार असल्याचा दावा ठाकरेसेनेच्या राऊतांनी केलाय...मात्र पवार याचा राजकीय इतिहास पाहता ते पूर्वेला जायचं असेल तर पश्चिमेला सांगतात, असं म्हणत दरेकरांनी पवारांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केलाय...

मुळात जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत शरद पवारांनी दिलेल्या स्पष्ट संदेशामुळे पवारांची राष्ट्रवादी NDAसोबत जाणार असल्याच्या चर्चांना आता ब्रेक लागलाय.... ज्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रमही पवारांच्या या भूमिकेनंतर दूर झाल्याचं समजतंय...मात्र राजकारणात काहीही शक्य असतं आणि महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी गेल्या काही वर्षांत दाखवून दिलंय. त्यात पवारांचं राजकारण समजण्याएवढं सरळही नसतं. त्यामुळे पवारांचे राजकीय डावपेच सहज समजून आले तर ते पवार कसले....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com