Ram Mandir  google
देश विदेश

Ram Mandir News: अयोध्येत श्री रामप्रभूंच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबाबत पाकिस्तानी मीडियात काय चर्चा सुरू? वाचा सविस्तर

Pakistani Media On Ram Mandir: अयोध्येत श्री रामप्रभूंचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडतोय. बाबरी मस्जीद पाडून अयोध्येत राम मंदिर बांधण्यात आलंय. यावर पाकिस्ताना माध्यमांची काय प्रतिक्रिया आहे, ते आपण जाणून घेऊ या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Ram Mandir Pran Pratishta Ceremony

अयोध्या शहरातील राम मंदिरात आज श्री रामप्रभूंचा अभिषेक होत आहे. त्यामुळे देशभरात जल्लोषाचं वातावरण आहे. भारतीय आणि परदेशी माध्यमांमध्येही राम मंदिराच्या अभिषेकाच्या बातम्या येत आहेत. पाकिस्तान आणि कतारसारख्या देशांच्या प्रसारमाध्यमांनीही (Pakistani Media) याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलंय. ते आपण जाणून घेऊ या. भारतासोबतच परदेशातही रामलल्लाच्या अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची जोरदार चर्चा होत आहे. पाकिस्तानी वृत्तपत्रांनी याबद्दल लिहिलं आहे की, 'आज पंतप्रधान बाबरी मशीद पाडल्यानंतर बांधलेल्या राम मंदिराचं लोकार्पण करणार आहेत. (latest ram mandir update)

पाकिस्तानातील वृत्तपत्र 'द डॉन'ने एक अभिप्राय लेख प्रकाशित केला आहे. ज्यात लेखक परवेझ हुदभॉय यांनी लिहिलंय की, जिथे पाच शतके जुनी बाबरी मशीद उभी होती, आता तिथे राम मंदिर (ram mandir) बांधले जात आहे. राम मंदिराभोवती व्हॅटिकन सिटीसारखे शहर तयार झालंय. नव्या भारतात धार्मिक सांप्रदायिकता यापुढे द्वेष मानली जाणार नाही, असं लेखात म्हटलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पाकिस्तानी वृत्तपत्रात लिहिलंय की, मार्च 2023 मध्ये 'जय श्री राम'चा नारा देणाऱ्या जमावाने जुना मदरसा आणि एक प्राचीन ग्रंथालय जाळलं होतं. 12व्या शतकात मुस्लिम आक्रमक बख्तियार खिलजीने नालंदा विद्यापीठाला आग लावली. तेथील प्रचंड ग्रंथालय नष्ट केलं होतं. त्यांनी म्हटलंय की, हा संदेश भाजप विरोधक काँग्रेससाठी आहे. त्यांनी धर्मनिरपेक्षता सोडून धार्मिक खेळावर भाजपशी खेळावे. तसं केलं नाही, तर त्यांच्याकडे हिंदुविरोधी म्हणून पाहिलं जाईल.

पाकिस्तानी वृत्तपत्र पाकिस्तान टुडेने (Pakistani Media) लिहिलंय की, मोदींच्या हिंदू राष्ट्रवादी भारतीय जनता पक्षाने मंदिर बांधण्याचे आश्वासन दिलं होतं. त्यांच्यासाठी हा नेहमीच एक राजकीय मुद्दा राहिला आहे. यामुळे त्यांना सत्तेवर येण्यास आणि येथे राहण्यास मदत झालीय. मे महिन्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पंतप्रधान मोदींच्या निवडणूक प्रचाराचा आभासी प्रक्षेपण म्हणूनही या सोहळ्याकडे पाहिलं जातंय, असंही त्यांनी म्हटलंय.

कतारच्या एका माध्यमाने अभिप्राय लेख प्रकाशित केलाय. भारताची धर्मनिरपेक्षता भगव्या राजकारणाच्या डोंगराखाली गाडली जातेय, असं त्यांनी म्हटलं आहे. धर्मनिरपेक्ष भारताच्या पंतप्रधानांनी (ayodhya) मंदिराचं उद्घाटन करणं अयोग्य आहे, असंही म्हटलंय.

नेपाळमधील वृत्तपत्र 'द काठमांडू पोस्ट'ने आपल्या एका वृत्तात लिहिलंय की, मंदिराच्या उद्घाटनात रामापेक्षा जास्त प्रसिद्धी मिळवणारी व्यक्ती म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. भारत धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वापासून खूप दूर गेला आहे. अयोध्येत भारताची धर्मनिरपेक्षता उद्ध्वस्त झाली आहे, असा आरोप या वृत्तपत्राने (Pakistani Media) केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

Sneha Wagh: आता मुंबई आपलीशी वाटत नाही...; यूपीतून परत आल्यावर अभिनेत्री स्नेहा वाघ असं का म्हणाली?

High cholesterol symptoms: डोळ्यापासून-पायांपर्यंत...! पाहा शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यावर कोणत्या अवयवांमध्ये दिसतात लक्षणं?

Diwali Lakshmi Pujan: लक्ष्मीपूजनात राशीनुसार करा हे खास उपाय, भरपूर पैसा अन् सुख- समृद्धी मिळेल

Fraud Case : शिंदेसेनेच्या कार्यकर्त्याचा व्यावसायिकाला १३ लाखांचा गंडा, फसवणुकीचा प्रकार उघड, नेमकं काय घडलं ?

SCROLL FOR NEXT