Chetan Bodke
संपूर्ण रामभक्त ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते, तो दिवस आज उजडला आहे.
अयोध्येतील भव्य दिव्य राम मंदिरात आज प्रभु श्रीराम विराजमान होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी हा ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे.
या सोहळ्याला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे.
अभिनेत्री कतरिना कैफ आणि पती विकी कौशलने स्पेशल पारंपारिक लूक परिधान करत अयोध्येसाठी रवाना झाले.
त्यासोबतच अभिनेत्री आणि निर्माती माधुरी दिक्षीत, पती श्रीराम नेणे यांनीही स्पेशल लूक परिधान करीत अयोध्येसाठी रवाना झाले.
बिग बी अमिताभ बच्चन यांनी पारंपारिक कपडे परिधान करत अयोध्येसाठी रवाना झाले आहेत.
रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि रोहित शेट्टीही काल रात्री अयोध्येसाठी रवाना झाले आहेत.
रणबीर कपूरच्या पारंपारिक लूकचीही सध्या चाहत्यांमध्ये चर्चा होत आहे.
अभिनेत्री कंगना रणौतनेही राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी हजेरी लावली आहे.