Chetan Bodke
अभिनेत्री क्रिती सेनॉन सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळे बरीच चर्चेत आहे.
तिचा आणि अभिनेता शाहिद कपूरचा 'तेरी बातो मैं ऐसा उल्झा जिया' चित्रपट येत्या ९ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.
सध्या हे दोघेही चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असून प्रमोशननिमित्त क्रिती हटके आऊटलूक करत फॅशन करताना दिसते.
नुकतंच अभिनेत्रीने डेनिम लाँग वनपिस वेअर करत हटके फोटोशूट केलेला दिसत आहे.
नव्या फोटोशूटमध्ये क्रितीने डेनिम लाँग वनपिस वेअर केला आहे.
ग्लॉसी मेकअप, आय लायनर आणि इयर रिंग्ज असा तिने लूक पूर्ण केला आहे.
अभिनेत्रीच्या ह्या गॉर्जियस लूकवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
कोणताही आऊटफिट असो, आपल्या खास शैलीने क्रिती चाहत्यांचे मन वेधते.