Chetan Bodke
आदिती राव हैदरी भारतीय सिनेसृष्टीतली एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अदितीने फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर टॉलिवूडमध्येही तिने अनेक चित्रपट केले आहेत.
आदिती एक प्रसिद्ध अभिनेत्रीच नाही तर प्रसिद्ध डान्सर सुद्धा आहे. तिने मॉडेलिंग क्षेत्रातही आपले नशीब आजमावले आहे.
आदिती कायमच सोशल मीडियावर आपल्या खास फॅशनमुळे चर्चेत राहते. नुकतंच तिने सोशल मीडियावर ब्लॅक घागरा घालून खूप सुंदर फोटो शेअर केले आहेत.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने ब्लॅक कलरचा घागरा परिधान केला असून तिच्या घागऱ्यावर असलेल्या बारीक नक्षीकामांनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
लूकला साजेसा अभिनेत्रीने मेकअप केली असून कानामध्ये झुमका आणि हातामधल्या बांगड्या घालून तिने आपला लूक पूर्ण केला आहे.
आदितीचा सोज्वळ चेहेरा आणि निरागस डोळे यांचं कायमच चाहते सोशल मीडियावर कौतुक करीत असतात.
कोणताही आऊटफिट्स असो, आपल्या खास शैलीने आदिती कायमच चाहत्यांचे मन जिंकले.
नव्या फोटोंमध्ये आदितीचा मनमोहक अंदाज पाहायला मिळत आहे.
लवकरच आदितीचा संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'हिरामंडी' वेबसीरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.