Ayodhya Ram Mandir Invitation Saam Digital
देश विदेश

Ayodhya Ram Mandir Invitation: सचिन तेंडुलकरला मिळालं राम मंदिर प्रतिष्ठापणेचं निमंत्रण, कधी जाणार अयोध्येला?

Ayodhya Ram Mandir Invitation News: राम मंदिरात अभिषेक होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले असून संपूर्ण देश या भव्य सोहळ्याचा साक्षीदार होणार आहे. दरम्यान भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरलाही राम मंदिर प्रतिष्ठापणेचं निमंत्रण पाठवण्यात आलं आहे.

Sandeep Gawade

Ayodhya Ram Mandir Invitation

अयोध्येत सध्या राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापणेची धामधून असून सर्वत्र राम ललाच्या आगमनाची आनंदाची बातमी गुंजत आहे. भगवान श्रीरामाच्या जन्मस्थानी भव्य मंदिर उभारल्यामुळे देशात एक वेगळेचं उत्सवाचं वातावरण आहे. राम मंदिरात अभिषेक होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले असून संपूर्ण देश या भव्य सोहळ्याचा साक्षीदार होणार आहे. दरम्यान भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरलाही राम मंदिर प्रतिष्ठापणेचं निमंत्रण पाठवण्यात आलं आहे.

२२ जानेवारीला देशात होणाऱ्या सर्वात मोठ्या धार्मिक कार्यक्रमात सामील होणाऱ्या मान्यवरांमध्ये आता सचिन तेंडुलकरचंही नाव सामिल झालं आहे. त्यामुळे राम मंदिर प्रतिष्ठापणेला सचिन तेंडुलकरही जाणार आहे. एएनआयने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. मास्टर ब्लास्टरची श्रद्धा सर्वांनाच माहिती आहे. दरवर्षी तो घरी गणपतीची मूर्ती बसवतो आणि कुटुंबासोबत पूर्ण भक्तिभावाने साजरा करतो.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अयोध्येत आयोजित करण्यात आलेल्या राम मंदिर प्रतिष्ठापणेच्या विषेश कार्यक्रमासाठी सुमारे 8000 मान्यवरांना आमंत्रित करण्यात आलं आहे. रामललाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापणा सोहळ्यात विशेष व्यक्ती सहभागी होणार आहेत. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रमुख (आरएसएस) मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनाही निमंत्रित करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तिरोडामध्ये रविकांत बोपचे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Winter Foods: हिवाळ्यात भारतातील या ठिकाणांना भेट देण्याचा विचार करत आहात का? 'हे' पदार्थ नक्की खाऊन बघा..

Samosa Recipe: घरच्या घरी नाश्त्याला बनवा खुसखुशीत समोसा; बाहेरचे तेलकट पदार्थ खाणे द्याल सोडून

Maharashtra Politcs : निकालाच्या आदल्या दिवशी भाजपला मोठा धक्का; मुंबईतील बड्या नेत्याने हाती धरली उद्धव ठाकरेंची मशाल

Night Jasmine: घराच्या बागेत लावा पारिजातकाचं झाड, मनमोहक सुगंधाने बहरेल तुमची बाग

SCROLL FOR NEXT