Hotels booking in Ayodhaya Saam Tv
देश विदेश

Ayodhya Ram Mandir: अयोध्येत हॉटेल्सना सोन्याचे दिवस; रुम बुकींगचे रेकॉर्ड मोडले; एका दिवसासाठी मोजावी लागतेय 'इतकी' किंमत

Hotels Booking In Ayodhya: अयोध्येमध्ये सध्या हॉटेल्सचे दर गगनाला भिडले आहेत. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम जवळ येत आहे, त्याअगोदरच हॉटेलच्या बुकिंगमध्ये अभूतपूर्व वाढ झालीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Hotels Booking For Ram Mandir Pran Pratishta

अयोध्येत २२ जानेवारीला रामल्लाचा प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir) सोहळा पार पडणार आहे. त्यापूर्वी हॉटेलमध्ये मुक्कामासाठी बुकिंगमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे हॉटेलचे दर उंचावले आहेत. प्रवाशांच्या गर्दीमुळे हॉटेलच्या किमती, खाद्यपदार्थ याचे देखील भाडे वाढले आहे. (ram mandir latest update)

राममंदिराचा अभिषेक २२ जानेवारीला होणार आहे. तेथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अयोध्येतील (Ayodhaya) हॉटेलचं जेवण आणि भाडे यांच्या किमती वाढल्या आहेत. अयोध्येतील हॉटेलच्या खोल्यांच्या किमती (Ayodhya Hotels Room Price) गगनाला भिडल्या आहेत. राममंदिराच्या उद्घाटनाच्या सुमारे दोन आठवड्यांपूर्वी अयोध्येतील हॉटेल रूमचे बुकिंग लं ८० टक्क्यांनी वाढलं आहे. येथे हॉटेलमधील एका दिवसाच्या खोलीची किंमत पाच पटीने वाढली आहे. काही आलिशान खोल्यांचं भाडं एक लाख रुपयांवर गेलं आहे.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हॉटेलच्या भाड्यात लक्षणीय वाढ

विशेष म्हणजे भाड्यात एवढी मोठी वाढ होऊनही हॉटेल बुकिंग (hotels in Ayodhya) दररोज वाढत आहे. २२ जानेवारीला अपेक्षित लोकसंख्येचा अंदाज पाहिल्यास, राम मंदिराच्या अभिषेकाच्या दिवशी देशभरातून सुमारे ३ ते ५ लाख लोकं अयोध्येत पोहोचणार आहे. आत्तापर्यंत अयोध्येतील बहुतेक हॉटेल्स आधीच बुक झाले आहेत. शिल्लक राहिलेल्या हॉटेलच्या भाड्यात लक्षणीय वाढ झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार २२ जानेवारी रोजी सिग्नेट कलेक्शन हॉटेलमधील एका खोलीचे भाडे ७० हजार २४० रुपये आहे. तर गेल्या वर्षी जानेवारीत या खोलीची किंमत १६,८०० रुपये होती, म्हणजेच त्यात चार पट वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे, रामायण (ram mandir) हॉटेलमध्ये एक खोली ४० हजार रुपये प्रतिदिन उपलब्ध आहे. तर जानेवारी २०२३ मध्ये त्याचे भाडे १४ हजार ९०० रुपये होते. हॉटेल अयोध्या पॅलेस १८ हजार २२१ रुपयांना एक खोली देत ​​आहे. जानेवारी २०२३ मध्ये त्याचे भाडे पाचपट कमी होते. जानेवारी २०२३ मध्ये या हॉटेलमधील एका खोलीचे भाडे ३,७२२ रुपये प्रतिदिन होते.

मोठी गर्दी होण्याची शक्यता

नुकत्याच उघडलेल्या पार्क इन रॅडिसनमधील सर्वात आलिशान रुम १ लाख रूपयांत बुक केली आहे. हॉटेल पार्क इन बाय रॅडिसनचे वैभव कुलकर्णी म्हणाले की, हॉटेलचं बुकिंग आधीच झालंय. मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. हॉटेल रूमचे भाडे दररोज ७ हजार ५०० रुपयांपासून सुरू होते. तसंच रामायण हॉटेलमध्ये २० ते ३० जानेवारीपर्यंत हॉटेल्स आधीच बुक करण्यात आली आहेत. फेब्रुवारी आणि मार्चमध्येही ८० टक्के बुकिंग झाले आहे. येथील हॉटेल रूमचे भाडे १० ते २५ हजार रुपयांपर्यंत सुरू होते. येत्या काही दिवसांत ते आणखी वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका केव्हा, कधी आणि कुठे लाईव्ह पाहता येणार?

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा थेट सवाल

Vanita Kharat मराठी सिनेसृष्टीतील टॉपची अभिनेत्री, पण नवरा काय करतो? तुम्हाला माहितीये का

Maharashtra News Live Updates: बच्चू कडू यांनी विशाल शक्ती प्रदर्शन करत काढली बाईक रॅली

Vinod Tawde: एक है तो सेफ है, राहुल गांधी फेक है, काँग्रेसच्या आरोपांवर विनोद तावडेंचं उत्तर

SCROLL FOR NEXT