Army Saam
देश विदेश

Army Officer: सैनिकाला वाचवलं, पण स्वत:चा जीव गमावला; शहीद लेफ्टनंट शशांक यांचं स्मारक होणार, राज्य सरकारची घोषणा

Lieutenant Shashank Tiwari: कर्तव्य बजावताना अयोध्येचे सुपुत्र लेफ्टनंट शशांक तिवारी यांना वीरमरण आलं आहे. सैनिकाला वाचवताना त्यांचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे.

Bhagyashree Kamble

उत्तर प्रदेशातील रहिवासी लेफ्टनंट शंशाक तिवारी सिक्कीममध्ये शहीद झाले आहेत. ऑपरेशनल पेट्रोलिंगदरम्यान त्यांच्या युनिटमधील एक जवान वेगवान प्रवाह असलेल्या नदीत बुडाला. शशांक यांनी क्षणाचाही विलंब न करता नदीत उडी घेतली आणि सहकाऱ्याचा जीव वाचवला. मात्र, त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवारी त्यांच्या पार्थिवावर अयोध्येत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या अचानक जाण्यामुळे तिवारी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

शुक्रवारी रात्री लेफ्टनंट तिवारी यांचे पार्थिव अयोध्येत पोहोचले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच त्यांचे अयोध्येत स्मारक बांधले जाईल, असे त्यांनी सांगितले. याशिवाय तिवारी कुटुंबाला राज्य सरकारकडून ५० लाख रूपयांची आर्थिक मदत दिली जाईल, असे जाहीर केले.

लेफ्टनंट तिवारी यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार शनिवारी सकाळी जामतारा घाटावर लष्करी सन्मानाने करण्यात येणार आहे. शशांक तिवारी हे आपल्या आई वडिलांचे एकुलते एक पुत्र होते. त्यांचे वडील जंग बहादूर तिवारी हे सध्या मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत असून, अमेरिकेत राहतात. ते आज सकाळपर्यंत अयोध्येत पोहोचण्याची शक्यता आहे. तर, त्यांची आई त्यांच्या कुटुंबासह कौशल्यपुरी कॉलनीत राहतात. तसेच त्यांना एक बहीण देखील आहे. त्यांची बहीण दुबईमध्ये राहत असल्याची माहिती आहे.

शशांक तिवारी लहानपणापासून अभ्यासात खूप हुशार होते. त्यांनी २०२९ साली पहिल्याच प्रयत्नात एनडीएची परीक्षा उत्तीर्ण केली. १७ डिसेंबर २०२४ साली ते सैन्यात सामील झाले. त्यांची पहिली पोस्टिंग सिक्कीममध्ये झाली.

भारतीय लष्कराने शशांक तिवारी यांच्या शौर्याची प्रशंसा करताना म्हटले की, 'इतक्या कमी वयात इतका धाडसी निर्णय घेणे, हे कर्तव्यनिष्ठेची ओळख आहे. लेफ्टनंट तिवारी हे आजच्या तरूणांसाठी आदर्श आहेत'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अहिल्यानगर शहरातील जैन समाजाची जमीन संग्राम जगताप यांनी हडप केल्याचा आरोप

Accident News : पुण्यात अपघाताचा भयानक थरार! भरधाव कार मेट्रो पिलरला धडकली, गाडीचा चक्काचूर

Ladki Bahin Yojana : फक्त १२ दिवस शिल्लक! आतापर्यंत फक्त ८० लाख लाडक्या बहिणींचे e-KYC पूर्ण; मुदत वाढवणार का? आदिती तटकरेंनी स्पष्टचं सांगितलं

Woman Physical Changes: प्रेग्नेसीनंतर स्त्रियांच्या शरीरात होतात हे ५ बदल, वेळीच घ्या काळजी

Local Body Election : शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला जोरदार धक्का, नंदुरबारमध्ये अनेकांनी कमळाची साथ सोडली

SCROLL FOR NEXT