Shocking Crime: कौटुंबिक वाद अन् बायकोनं नवऱ्याचं गुप्तांग कापलं, हुंड्यासाठी होणाऱ्या छळामुळे पत्नीनं विष पिऊन..

Wife Violent Outburst Leaves Husband in Critical Condition: कौटुंबिक वादादरम्यान पत्नीने रागाच्या भरात पतीचा धारदार शस्त्राने गुप्तांग कापला. त्यानंतर पत्नीने स्वत: अॅसिड पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
Crime
Crime Saam Tv
Published On

उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. कौटुंबिक वादादरम्यान पत्नीने रागाच्या भरात पतीचा धारदार शस्त्राने गुप्तांग कापला. त्यानंतर पत्नीने स्वत: अॅसिड पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सध्या दोघांवर रूग्णालयात उपचार सुरू असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना उत्तर प्रदेशातील असमोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. बुधवारी रात्री पती-पत्नीमध्ये तीव्र वाद झाला होता. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. पत्नीने धारदार शस्त्राने पतीच्या गुप्तांगावर वार केला. धारदार शस्त्राने केलेल्या वारामुळे पती वेदनेनं विव्हळत होता. त्याला तातडीने रूग्णलयात नेण्यात आले.

Crime
Vaishnavi Hagawane: स्पाय कॅमेऱ्यानं बायकोचे बेडरूममधील VIDEO शूट करायचा अन्..; हगवणे प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणकडून बायकोचा छळ

याच घटनेनंतर काही वेळातच, महिलेने घरातील अॅसिड पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिला तात्काळ मुरादाबाद जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं असून, तिची स्थितीही चिंताजनक आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या महिलेने पोलिसांना सांगितले की, तिच्यावर लग्नानंतरपासूनच सासरच्या लोकांकडून हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. याच छळामुळे तिने पतीवर वार केले असल्याचं तिने सांगितलं.

Crime
Shocking: हायवेवरच कार थांबवून महिलेशी शरीरसंबंध, व्हिडिओ झाला लीक; आरोपी राजकीय पक्षाशी संबंधित

स्थानिक पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. दोघांचीही वैद्यकीय स्थिती गंभीर असल्याने, सविस्तर जबाब नोंदवण्यास वेळ लागू शकतो, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com