Sydney BMW Crash: 
देश विदेश

Sydney BMW Crash: पोटात ८ महिन्याचं बाळ, भरधाव कारने गर्भवतीला उडवले, एका क्षणात दोघांचाही मृत्यू

Sydney accident news : सिडनीमध्ये भीषण अपघातात ८ महिन्यांची गर्भवती भारतीय महिला समन्विता धारेश्वर यांचा आणि गर्भातील बाळाचा जागेवर मृत्यू झाला.

Namdeo Kumbhar

  • सिडनीमध्ये ८ महिन्यांच्या गर्भवती समन्विता धारेश्वर यांना भरधाव कारने जोरदार धडक दिली.

  • धडकेत आई आणि गर्भातील बाळाचा घटनास्थळी मृत्यू झाला.

  • १९ वर्षीय BMW चालकाविरोधात निष्काळजी वाहनचालकासह अनेक गंभीर गुन्हे दाखल.

  • मृत महिला IT सिस्टीम विश्लेषक असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Indian IT analyst Samnvita Dhareswar Sydney accident news : ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये प्रत्येकाच्या काळजाचा थरकाप उडवणारा अपघात झाला. आठ महिन्याच्या गर्भवती महिलेला भरधाव वेगात आलेल्या BMW कारने जोरात उडवले. या धडकेत आई अन् बाळाचा जागेवरच मृत्यू झाला. समन्विता धारेश्वर असं मयत महिलेचं नाव असून ती मुळची भारतीय आहे. ३३ वर्षाची समन्विता नवऱ्यासोबत सिडनीमध्ये रस्ता पार करत होती. त्यावेळी BMW कारने जोरात धडक दिली अन् क्षणात होत्याचे नव्हते झाले.

३३ वर्षांची समन्विता सिडनीमध्ये नवरा आणि तीन वर्षांच्या मुलासोबत फिरत होती. दुसऱ्या बाळाचा जन्म काही दिवसांत होणार होता. पण त्यांच्यावर काळाने घाला केला. रस्ता ओलांडत असताना कारने जोरात धडक दिली. त्यामध्ये त्यांचा आणि पोटातील बाळाचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांकडून या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, मृत समन्विता धारेश्वर या अलस्को युनिफॉर्म्स या कंपनीत IT सिस्टीम विश्लेषक म्हणून कार्यरत होत्या.

सिडनी पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे. पोलिसांनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, सिडनीत धारेश्वर कुटुंब रस्ता पार करत होते. त्यामुळे एक किया कार थांबली होती. पण त्याचवेळी भरधाव वेगात आलेल्या बीएमडब्ल्यूने किया कारला भीषण धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की किया कार अतिशय वेगात पुढे गेली अन् ८ महिन्याची गर्भवती असणाऱ्या समन्विताला धडकली. या अपघातामुळे ३३ वर्षांची भारतीय समन्विता यांचा जागेवरच मृत्यू झाला अन् पोटात असणाऱ्या ८ महिन्याच्या बाळानेही श्वास थांबवला. परिसरात एका क्षणात हळहळ अन् स्मशान शांतता पसरली.

सिडनी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी बीएमडब्ल्यू चालवणारा १९ वर्षीय ऑस्ट्रेलियन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूला कारणीभूत ठरणे आणि गर्भाचा मृत्यू घडवणे असे आरोप ठेवण्यात आले आहेत. आरोपीची कसून चौकशी करण्यात येत आहे. ८ महिन्याच्या बाळाचा गर्भातच मृत्यू झाल्याने सिडनीमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Health : हिवाळ्यात दही खावं की नाही? वाचा फायदे-तोटे

Ramesh Pardeshi: फक्त 'या' कारणासाठी राज साहेबांना सोडलं, 'मुळशी पॅटर्न'चा पिट्याभाई ढसाढसा रडला; पाहा VIDEO

Shocking : मुंबई हादरली! पेट्रोल पंपावर बिल्डरवर गोळीबार, दोन गोळ्या पोटात घुसल्या

Parineeti Chopra Baby Name : परिणीती चोप्रा अन् राघव चड्ढाच्या लेकाचं बारसं, नावाचा अर्थ सांगत शेअर केला फोटो

Leopard Attack : शेतात दबा धरून बसला, संधी साधून बिबट्याने दुचाकीवरून जाणाऱ्या नवरा बायकोवर झडप घातली

SCROLL FOR NEXT