Local Body Election : ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला भाजपने दिले नगराध्यक्षपदाचे तिकिट

Vinod Gangne BJP candidate background details : तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी विनोद गंगणे यांना भाजपकडून नगराध्यक्षपदाचे तिकिट देण्यात आले असून धाराशिवच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या निर्णयावरून विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे.
Vinod Gangne BJP candidate background details
Vinod Gangne BJP candidate background details
Published On
Summary
  • तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी विनोद गंगणे यांना भाजपने थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली.

  • या निर्णयामुळे धाराशिवमधील राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे.

  • विरोधकांनी भाजपवर ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना राजाश्रय देत असल्याचा आरोप केला.

  • गंगणे यांच्या उमेदवारीमुळे तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचा मुद्दा निवडणुकीत पुन्हा चर्चेत आला.

BJP Nominates Tuljapur Drugs Case : धाराशिवमधील गाजलेले तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी विनोद गंगणे यांना भाजपाकडून थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली आहे. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली होती. याच प्रकऱणाती गंगणे यांना आधी भाजपकडून पक्षात घेण्यात आले, त्यानंतर आता थेट नगराध्यक्षपदाचे तिकिट देण्यात आले. भाजपच्या या निर्णायानंतर धाराशिवमध्ये टीकेची झोड उडाली आहे. ठाकरेंचे आमदार ओमराजे निंबळाकर यांनी भाजप आमदार राणा राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर टीकेची झोड उडवली आहे.

राज्यभर गाजलेल्या तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीलाच भाजपाने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिल्याने धझाराशिवच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडालीआहे. तुळजापुरातील ड्रग्ज प्रकरण उजेडात आणायला विनोद गंगणे यांचीच मदत झाल्याचा दावा भाजपकडून केला जातोय. विनोद गंगणे हा ड्रग्ज प्रकरणातील आरोपी असून तो सध्या जामीनावर बाहेर आहे, ड्रग्ज प्रकरणात काही दिवस तुरुंगात रवाणगी झालेली.

Vinod Gangne BJP candidate background details
‘अजित पवारsss सगळ्यांचा नाद...,भाजप नेत्याच्या मुलाचे उपमुख्यमंत्र्यांना चॅलेंज, व्हिडिओने खळबळ

काही दिवसापूर्वीच ड्रग्ज प्रकरणातील जामीनावर बाहेर असणारा आरोपी माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वरला भाजपमध्ये प्रवेश दिल्याने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर टिका झाली होती. भाजप ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना राजाश्रय देत असल्याचे सुप्रिया सुळेंनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. विनोद गंगणे याला भाजपाने नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिल्याने निवडणूकीत तुळजापूर ड्रग्जचा मुद्दा पुन्हा एखदा चर्चेत आला आहे.

Vinod Gangne BJP candidate background details
Cold Wave Alert : पारा घसरला, दबबिंदू गोठले; १४ जिल्ह्यांमध्ये थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा, वाचा IMD चा अंदाज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com