भारत- पाक मॅच नंतर काश्मिरी विद्यार्थ्यांवर हल्ला...(पहा व्हिडिओ) Saam Tv
देश विदेश

भारत- पाक मॅच नंतर काश्मिरी विद्यार्थ्यांवर हल्ला...(पहा व्हिडिओ)

काल झालेल्या भारत- पाकिस्तान यांच्यात टी- 20 विश्वचषक सामन्यामध्ये भारताचा दारुण पराभव झाला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : काल झालेल्या भारत- पाकिस्तान यांच्यात टी- 20 विश्वचषक सामन्यामध्ये भारताचा दारुण पराभव झाला आहे. यावरुन भारतीयांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. या नाराजीचे परीणाम विविध ठिकाणी बघायला मिळत आहेत. पंजाबमधील एका महाविद्यालयात काही काश्मिरी विद्यार्थ्यांवर कथितपणे हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

हे देखील पहा-

मिळालेल्या माहितीनुसार, भाई गुरदास इंस्टीट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये शिकत असलेले विद्यार्थी भारत- पाकिस्तान सामना बघत होते. त्या सामन्यात भारताचा पराभव झाल्यावर काही उत्तर प्रदेशच्या विद्यार्थ्यांनी काश्मिरी विद्यार्थ्यांवरती हल्ला करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

दरम्यान, याप्रकरणी कोणत्याही बाजूने किंवा कॉलेज व्यवस्थापनाकडून तक्रार दाखल करण्यात आली नाही.पंजाबच्या संगरुर जिल्ह्यामधील अभियांत्रिकी महाविद्यालयातील काश्मिरी विद्यार्थ्यांनी आरोप केला आहे की, भारताचा टी- 20 विश्वचषक सामन्यामध्ये पराभव झाल्याने, यूपीच्या काही विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला आहे.

याविषयी बोलताना काश्मीरी विद्यार्थी म्हणाले की, आम्ही इथे शिकण्याकरिता आलो आहोत. आम्ही सर्व भारतीय आहोत, पण तरी देखील आमच्याशी अशी वागणूक करण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांनी त्यांच्या खोल्यांमध्ये तोडफोड केल्याचा आरोप देखील केले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks : गॅस पेटवण्याआधी करा हे १ काम, LPG सिलेंडर चालेल १५ दिवस जास्त

Diwali Vacation : दिवाळीत प्लान करा फॉरेन ट्रिप, थायलंडच्या निसर्ग सौंदर्याचा घ्या आनंद; ७ दिवसांत फिरा सुंदर बीच, मंदिरे अन् बेटं

Maharashtra News Live Update: नांदेडकरांनी घेतला चित्तथरारक घोडेस्वारी प्रदर्शनाचा आनंद

Winter Skin Care: हिवाळा सुरू होण्याआधी स्किन केअरमध्ये करा हे ७ बदल; त्वचा होईल मुलायम आणि चमकदार!

Satara District Bank Election: महायुतीचा जागावाटपाच फॉर्म्युला ठरला, अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी मोठी घडामोड

SCROLL FOR NEXT