Shreya Maskar
दिवाळीत परदेशात फिरण्याचा प्लान करत असाल तर थायलंड बेस्ट ऑप्शन आहे. थायलंड आग्नेय आशियाच्या मध्यभागी, इंडोचायना द्वीपकल्पावर वसलेले आहे.
थायलंडची राजधानी असलेल्या बँकॉकमध्ये भव्य राजवाडे, बौद्ध मंदिरे, शॉपिंग मॉल्स आणि स्ट्रीट फूडचा आनंद घेता येतो. येथे ग्रँड पॅलेस, वाट अरुण मंदिर, चाओ फ्राया नदी क्रूझ पाहायला नक्की जा.
समुद्रकिनारे, रोमांचक वॉटर स्पोर्ट्स, सुंदर सूर्यास्त आणि रंगीबेरंगी नाइटलाइफसाठी फुकेत प्रसिद्ध आहे. पाटोंग बीच, काता बीच, प्रोमथेप केप सूर्यास्त, फुकेत ओल्ड टाउन ही ठिकाणे फिरायला जा.
निळेशार समुद्र, उंच चुनखडीचे डोंगर आणि स्वच्छ पाण्यामुळे हे बेट फोटो आणि बोटिंगसाठी लोकप्रिय आहे. स्पीडबोट टूर करा. स्नॉर्केलिंगचा आनंद घ्या.
बँकॉकजवळील पटाया पर्यटनस्थळी समुद्रकिनारे, मनोरंजन, शॉपिंग आणि आकर्षक वास्तुकला पाहता येते. जॉम्टियन बीच, को लान बेट, जॉम्टियन बीच ही सुंदर ठिकाणे येथे आहेत.
प्राचीन मंदिरे, हिरवीगार पर्वतरांग, स्थानिक बाजारपेठा आणि थाई संस्कृती अनुभवण्यासाठी चियांग माई हे ठिकाण उत्तम आहे. येथील डोई सुथेप मंदिर, ओल्ड सिटी, नाईट बाजार नक्की फिरा.
निसर्गप्रेमी आणि जोडप्यांसाठी क्राबी एक सुंदर पर्याय आहे. येथे समुद्रकिनारे, चुनखडीचे डोंगर आणि बेटांवरील सहलींचा अनुभव घेता येतो.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.