Mumbai : वन डे ट्रिप पण मजा-मस्ती डबल, मुंबईपासून फक्त १ तासावर आहे 'हे' सुंदर डेस्टिनेशन!

Shreya Maskar

मुंबई ट्रिप लोकेशन

मुंबईत बोरीवली येथे नॅशनल पार्कमध्ये कान्हेरी लेणी हे ऐतिहासिक पर्यटन स्थळ वसलेले आहे. तुम्ही येथे वन डे ट्रिप प्लान करू शकता.

Destination in Mumbai | pinterest

कान्हेरी लेणी

कान्हेरी लेणी त्यांच्या 109 रॉक-कट बौद्ध लेण्यांच्या विशाल समूह, प्राचीन वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहेत. कान्हेरी लेणी सुमारे २,००० ते २,४०० वर्षे जुनी आहे.

Kanheri Caves | pinterest

नाव कसे पडले?

'कान्हेरी' हे नाव संस्कृतमधील 'कृष्णगिरी' या शब्दाशी संबंधित मानले जाते. 'कृष्ण' म्हणजे काळा आणि 'गिरी' म्हणजे डोंगर. काळ्या बेसॉल्ट खडकाच्या डोंगरात ही लेणी कोरलेली असल्यामुळे या नावाचा संबंध त्या भौगोलिक रचनेशी जोडला जातो.

Origin of the Name | pinterest

लेणी कधी बांधल्या?

लेण्यांची सुरुवात साधारणपणे इ.स.पूर्व पहिल्या शतकात झाल्याचे मानले जाते. पुढील अनेक शतकांमध्ये येथे नवीन गुहा, विहार, प्रार्थनागृहे आणि शिल्पे तयार करण्यात आली. साधारणपणे इ.स. १०व्या शतकापर्यंत या लेणीसमूहाचा विकास झाल्याचे ऐतिहासिक संदर्भ दर्शवतात.

When Were the Caves Built? | pinterest

जलसाठे

पावसाचे पाणी साठवण्यासाठी खडकात कोरलेल्या टाक्या आणि पाण्याचे मार्ग आहेत.कठीण बेसॉल्ट खडकातून गुहा, प्रवेशद्वारे, खांब आणि दालने तयार केली आहेत.

Water Storage Systems | pinterest

ट्रेकिंग

तुम्हाला फॅमिलीसोबत साधा-सोपा ट्रेकिंग प्लान करायचा असेल तर कान्हेरी लेणीला नक्की भेट द्या. येथे तुम्हाला जंगलातील शांत परिसर अनुभवता येईल.

Trekking | pinterest

कधी भेट द्यावी?

कान्हेरी लेणीला पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात आवर्जून भेट द्या. येथे फोटोशूटचा देखील भन्नाट आनंद घेता येतो.

When to visit? | pinterest

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | pinterest

NEXT : दिवाळीच्या सुट्टीत कुठे फिरायला जायचं? पिंपरी-चिंचवडजवळील 'ही' ७ थंड हवेची ठिकाणं पाहाच

Pimpri-Chinchwad Hill Stations | AI PHOTO
येथे क्लिक करा...