Pimpri-Chinchwad Hill Stations : दिवाळीच्या सुट्टीत कुठे फिरायला जायचं? पिंपरी-चिंचवडजवळील 'ही' ७ थंड हवेची ठिकाणं पाहाच

Shreya Maskar

पिंपरी-चिंचवड

दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड हे ठिकाण फिरण्यासाठी अगदी बेस्ट लोकेशन आहे.

Pimpri-Chinchwad Hill Stations | pinterest

लोणावळा

लोणावळ्याला गेल्यावर हिरवेगार डोंगर, धबधबे, व्ह्यू पॉइंट्स पाहायला मिळतात. लोणावळ्याची चिक्की जगप्रसिद्ध आहे. येथे गेल्यावर टायगर्स लीप, भुशी डॅम आणि लोहगड पाहायला मिळते.

Lonavala | pinterest

खंडाळा

खंडाळा हे लोणावळ्याजवळ वसलेले थंड हवेचे ठिकाण आहे. हे ठिकाण दऱ्या, डोंगररांगा आणि सुंदर निसर्गदृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. मंकी पॉइंट आणि टायगर व्हॅली ही सुंदर ठिकाणे येथे आहेत.

Khandala | pinterest

पाचगणी

पाचगणी हे ठिकाण टेबल लँड, सुंदर दऱ्या आणि थंड हवामानासाठी प्रसिद्ध आहे. वर्षभर येथे थंड वातावरण अनुभवता येते. कुटुंबासोबत नक्की ट्रिप प्लान करा.

Panchgani | pinterest

महाबळेश्वर

महाबळेश्वर हे स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध आहे. येथे गेल्यावर वेण्णा लेक, आर्थर सीट, विल्सन पॉइंट या ठिकाणांना नक्की भेट द्या.

Mahabaleshwar | pinterest

माथेरान

माथेरान हे वाहनमुक्त पर्यटन स्थळ आहे. जंगलातील पायवाटा आणि सुंदर व्ह्यू पॉइंट्स हे मुख्य आकर्षण आहे.

Matheran | pinterest

ताम्हिणी घाट

तुम्हाला रोड ट्रिप प्लान करायची असेल तर ताम्हिणी घाटाला नक्की भेट द्या. डोंगररांगा, दऱ्या, धुक्याचे वातावरण पाहायला मिळते. येथे भन्नाट फोटोशूटचा आनंद घेता येतो.

Tamhini Ghat | pinterest

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | pinterest

NEXT : महाराष्ट्राच्या जवळच लपली आहेत 'ही' ४ सुंदर पर्यटन स्थळे; फिरा, खा अन् मनसोक्त एन्जॉय करा!

Maharashtra | AI PHOTO
येथे क्लिक करा...