Atishi Marlena Saam Tv
देश विदेश

Delhi Water Crisis : दिल्लीत पाणी प्रश्न पेटला; मंत्री आतिशी मार्लेना यांनी उपसलं आमरण उपोषणाचं हत्यार

Atishi Marlena News : दिल्लीत पाणी प्रश्नाचा मुद्दा पेटला आहे. दिल्लीत पाणी प्रश्नासाठी मंत्री आतिशी यांनी आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. मंत्री आतिशी यांनी दोन दिवसांपूर्वी मोदी सरकारला उपोषणाचा इशारा दिला होता.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : दिल्लीत पाण्याचा प्रश्न पेटला आहे. दिल्लीतील पाणी प्रश्नावरून दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी मार्लेना यांनी केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रश्नावरून मंत्री आतिशी मार्लेना यांनी आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं आहे.

दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी मार्लेना या आजपासून उपोषण बसणार आहेत. दिल्ली पाणीप्रश्नासाठी आतिशी आमरण उपोषण करणार आहेत. मंत्री आतिशी यांनी दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून दिल्लीचा पाणीप्रश्न सोडवला नाही तर आमरण उपोषणाचा इशारा दिला होता.

मंत्री आतिशी या आज शुक्रवारी सकाळी १० वाजता राजघाटला जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीवर श्रद्धांजली वाहून उपोषणाची सुरुवात करणार आहेत. एकीकडे आतिशी यांचं आज उपोषण सुरु होणार आहे. तर दुसरीकडे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणाकडून पाणी कमी मिळण्याच्या मुद्यावरून आप नेत्या, मंत्री आतिशी मार्लेना आमरण उपोषण सुरु करणार आहेत. उपोषण सुरु करण्याआधी सुनीता केजरीवाल यांच्यासोबत राजघाट येथील महात्मा गांधी यांच्या समाधीवर श्रद्धांजली वाहणार आहेत. तसेच त्यांच्यासोबत इतर आप नेते देखील उपस्थित असणार आहे. तर सुनीता केजरीवाल सकाळी ११ वाजता राजघटावर जाणार आहेत. तर सायंकाळ चार वाजता तिहार जेलजवळ जाणार आहेत.

दरम्यान, दिल्लीच्या पाणी प्रश्नावरून मंत्री आतिशी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत २१ जून रोजी आमरण उपोषणावर बसणार असल्याचे जाहीर केले होते. यावेळी त्यांनी या प्रश्नात पंतप्रधान मोदींनी हस्तक्षेप करावा, अशीही मागणी केली होती.

'काल हरियाणातून दिल्लीला ६१३ एमजीडीच्या ऐवजी ५१३ एमजीडी पाणी सोडलं. एक एमजीडी पाणी २८,५०० लोकांसाठी पुरते. त्यानुसार २८ लाख लोकांसाठी पाणी सोडण्यात आलेलं नाही, असे आतिशी म्हणाल्या. तसेच लोक उष्णतेमुळे त्रस्त झाले आहेत. त्याचबरोबर पाणीटंचाईलाही सामोरे जात आहेत, असेही त्या म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : जिगरी यार गद्दार निघाला! रात्री बायकोसोबत बेडवर; रागात नवऱ्याने मित्राचा गळाच चिरला

पुण्याचा दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित|VIDEO

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT