आज संपूर्ण देशभरात योगा दिन साजरा करण्यात येत आहे. देशभरातील अनेक नागरिकांनी योग दिनानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी योगासने केली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील श्रीनगरमध्ये योगा केला आहे. श्रीनगरच्या दल सरोवरच्या काठावर नरेंद्र मोदींना योगासने केली आहे. या कार्यक्रमात ७ हजारहून अधिक लोक सहभागी होते.पंतप्रधान मोदींनी नागरिकांना योगाचे महत्त्व देणारा संदेशदेखील दिला आहे.
श्रीनगरमध्ये मोदींनी ७ हजार लोकांसोबत योगा केला. पंतप्रधान मोदींना एक्स अकाउंटवरुन श्रीनगरमध्ये योगा करण्यासाठी आलेल्या नागरिकांसोबत योगा करतानाचे फोटो शेअर केले आहेत. यावेळी त्यांनी मुलांसोबत सेल्फीदेखील घेतला. या फोटोवर त्यांनी 'आम्ही 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत असताना, मी प्रत्येकाने योगाला त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याची विनंती करतो. योग शक्ती, चांगले आरोग्य आणि निरोगीपणा वाढवतो. श्रीनगरमधील या वर्षीच्या कार्यक्रमात सामील होऊन आनंद झाला'. असं कॅप्शन दिले आहे.
या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व नागरिकांना योग करण्याचे आवाहन केले आहे. यावेळी 'जगातील अनेक देशांमध्ये योग हा दैनंदिन जीवनशैलीचा एक भाग बनत आहे. 2015 मध्ये तुर्कमेनिस्तानमध्ये योग केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. येथील वैद्यकीय विद्यापीठात योगाचा समावेश करण्यात आला आहे.
सौदी अरेबियाने आपल्या शिक्षण केंद्रात योगाचा समावेश केला आहे. मंगोलियामध्ये अनेक योग शाळा चालवल्या जात आहेत. भारतात यावर्षी फ्रान्समधील 101 वर्षीय महिला योग शिक्षिकेला पद्मश्री देण्यात आली आहे. ती कधीच भारतात आली नाही. त्यांनी आपले जीवन योगाला समर्पित केले. २०१५ मध्ये ३५ हजार लोकांनी कर्तव्याच्या मार्गावर एकत्र योग केला. हा एक आंतरराष्ट्रीय विक्रम ठरला. गेल्या वर्षी न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात 130 देशांच्या प्रतिनिधींनी एकत्र योगासने केली होती. परदेशातील 10 मोठ्या संस्थांनीही योगास मान्यता दिली आहे. जगभरात योगा करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. ध्यान केंद्रित करण्यासाठी योग महत्त्वाचा आहे', असं पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.