राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी भारतीय जनता पक्षाचे (BJp) लोकसभा खासदार भर्तृहरी महताब यांची घटनेच्या कलम 95(1) अंतर्गत लोकसभेचे प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती केली. लोकसभा अध्यक्षाची निवड होईपर्यंत प्रोटेम स्पीकर आपले कर्तव्य बजावतील.
भर्तृहरी महताब हे ओडिशाच्या कटक मतदारसंघातून सात वेळा लोकसभेचे खासदार आहेत. याच वर्षी ओडिशात बिजू जनता दलला (बीजेडी) मोठा धक्का देत, भर्तृहरी महताब यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. महताब यांना संसदेच्या चर्चेतील प्रशंसनीय कामगिरीबद्दल 2017 पासून सलग चार वर्षे 'संसद रत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, हंगामी लोकसभा अध्यक्षांना पीठासीन अधिकाऱ्यांच्या पॅनेलद्वारे मदत केली जाईल. ज्यात काँग्रेस नेते के. सुरेश, द्रमुक नेते टीआर बालू, भाजपचे राधामोहन सिंग आणि फग्गन सिंग कुलस्ते आणि तृणमूल काँग्रेसचे नेते सुदीप बंदोपाध्याय आहेत.
महताब यांनी लोकसभा निवडणुकीआधी बिजू जनता दल (बीजेडी) सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. अठराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन 24 जूनपासून सुरू होणार आहे. नवनिर्वाचित सदस्य 24-25 जून रोजी शपथ घेतील. लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक 26 जून रोजी होणार आहे.
प्रोटेम स्पीकर किंवा हंगामी अध्यक्षांची नियुक्ती संसदेचे काम सुरळीत चालावे म्हणून तात्पुरता स्वरूपात केली जाते. सामान्यतः ही नियुक्ती जेव्हा नियमित अध्यक्ष किंवा सभापती निवडून आलेले नसतात किंवा काही कारणास्तव ते उपस्थित नसतात तेव्हा केली जाते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.