Atiq Ahmed Last Video Viral  SAAM TV
देश विदेश

Atiq Ahmed Last Video : मीडियाच्या कॅमेऱ्यासमोरच अतीक अहमद, अशरफला गोळ्या घातल्या; त्यानंतर सरेंडर, अवघ्या ३ सेकंदात हादरला प्रयागराज

Atiq Ahmed Last Video : प्रयागराजमध्ये कुख्यात गँगस्टर अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

Nandkumar Joshi

Atiq Ahmed Last Video Viral : प्रयागराजमध्ये कुख्यात गँगस्टर अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. प्रयागराज येथील मेडिकल कॉलेजच्या बाहेरच ही घटना घडली. १३ एप्रिल रोजी झांसी जिल्ह्यातील परीछा डॅम परिसरात अतीकचा मुलगा असद आणि गुंड मोहम्मद गुलाम यांचा एन्काउंटर करण्यात आला होता.

तिघांनी गोळ्या झाडल्या

प्रयागराजच्या काल्विन हॉस्पिटलमध्ये दोघांना वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात येत होते. त्याचवेळी मीडियाच्या प्रतिनिधींशी ते बोलत होते. त्यावेळी दुचाकीवरून मारेकरी आले. ते तिघेही रिपोर्टर बनून आले होते. त्यांनी पिस्तूल काढले आणि अतीक, अशरफ यांच्यावर गोळ्या झाडल्या.

तब्बल ९ ते १० सेकंदापर्यंत ते गोळ्या झाडत होते. त्यानंतर मारेकरी स्वतःहून शरण आले. लवलेश, सनी आणि अरूण अशी तिघा मारेकऱ्यांची नावे आहेत, अशी माहिती दिली जात आहे. पोलिसांनी हल्लेखोरांकडून तीन पिस्तूल, जिवंत काडतूसे आणि एक कॅमेरा आणि बूम जप्त केला आहे. (Breaking Marathi News)

उमेश पाल हत्या प्रकरणात आतापर्यंत काय घडलं?

२४ फेब्रुवारी प्रयागराजमध्ये उमेश पाल आणि दोन गनर्सची हत्या करण्यात आली.

२५ फेब्रुवारी रोजी उमेश पाल याची पत्नी जया यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

२७ फेब्रुवारी रोजी अतीकची पत्नी शाइस्ता हिने कोर्टात अर्ज दाखल केला. पोलिसांनी त्यांच्या अल्पवयीन मुलांना नेले असा आरोप त्यांनी केला. (Latest Marathi News)

२७ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी अतीक अहमदचा नीकटवर्तीय अरबाजला मारलं. पोलिसांनी वकिलीचं शिक्षण घेणाऱ्या सदाकत खानला अटक केली.

सदाकतच्या खोलीतच हत्येचा कट रचण्यात आल्याचे सांगण्यात येत होते.

३ मार्च रोजी पोलिसांनी शूटर्सची ओळख पटवली.

४ मार्च रोजी अतीक अहमदच्या दोन्ही मुलांना सुधारगृहात पाठवण्यात आले

५ मार्च रोजी हल्लेखोरांवरील बक्षीसाची रक्कम अडीच लाखांवरून पाच लाख करण्यात आली.

६ मार्च रोजी उमेश पाल यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या विजय कुमार उर्फ उस्मान याचा एन्काउंटर

१३ एप्रिल रोजी असद आणि गुलामचा एन्काउंटर

अतीक आणि अशरफची पोलीस कोठडीत रवानगी

१५ एप्रिल रोज अतीक अहमद आणि अशरफ यांची गोळ्या झाडून हत्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT