Jharkhand Accident: भीषण अपघात! बस- ट्रकच्या धडकेत 10 जण जागीच ठार Saam Tv
देश विदेश

Jharkhand Accident: भीषण अपघात! बस- ट्रकच्या धडकेत 10 जण जागीच ठार

झारखंडच्या पाकूरमध्ये LPG सिलेंडर घेऊन जाणाऱ्या ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : झारखंडच्या पाकूरमध्ये LPG सिलेंडर घेऊन जाणाऱ्या ट्रक (Truck) आणि बसचा भीषण अपघात (Terrible Accident) झाला आहे. बुधवारी सकाळीच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातामध्ये १० जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर २०-२५ जण जखमी झाले आहेत. पाकूरच्या लिट्टीपाडा (Littipada)- आमदापारा मुख्य रस्त्यावर पडेरकोलाजवळच हा भीषण अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातावेळी ४० हून अधिक लोक प्रवास करत होते.

हे देखील पहा-

बसचा (bus) अपघात इतका भीषण होता की, अपघातानंतर बसमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याकरिता बसचा पत्रा कापावा लागला आहे. पोलिसांनी (police) दिलेल्या माहितीनुसार, अपघातामध्ये जखमी झालेल्यापैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सिलिंडरच्या (LPG cylinder) ट्रक भरधाव वेगाने येत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शिंनी दिली. ही धडक एवढी जोरदार होती, की दोन्ही गाड्यांचा जागेवरच चक्काचूर झाला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. प्रशासन (Administration) आणि पोलिसांचे पथक येण्याअगोदरच मदत आणि बचावकार्य सुरू झाले होते. त्यानंतर लगेच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. जखमींना रुग्णालयामध्ये (hospital) हलविण्याचे काम वेगात करण्यात आले. अपघातानंतर जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाचे उच्चपदस्थ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ अधिकारी या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनाकरिता पाठवले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Traffic : घोडबंदर रस्त्यावर वाहतूक कोंडी वाढली; जाणून घ्या कारण

Gokak Waterfalls: सांगलीपासून २ तासांच्या अंतरावर आहे 'हा' धबधबा; गर्दी नको असेल तर आहे परफेक्ट डेस्टिनेशन

Nag Panchami 2025: नागपंचमीला शिवलिंगावर या ३ गोष्टी अर्पण केल्याने दूर होतात संकटं

Dhadgaon News : अंगणवाडी मदतनीस पदावर नियुक्त महिलेला मारहाण; नंदुरबार जिल्ह्यातील धक्कादायक घटना

Coconut Water: नारळ पाणी प्यायल्यानंतर 'या' गोष्टी खाणं टाळा, नाहीतर...

SCROLL FOR NEXT