punjab shocking news Saam tv
देश विदेश

सहाय्यक उपनिरीक्षक आणि होमगार्डची गोळ्या झाडून हत्या; पोलीस दलात खळबळ

punjab shocking news : सहाय्यक उपनिरीक्षक आणि होमगार्डची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

गुरुदासपूरमध्ये मध्यरात्री दोन पोलीस कर्मचाऱ्यांची गोळ्या झाडून हत्या

सहाय्यक उपनिरीक्षक आणि होमगार्ड यांचा गोळीबारात जागीच मृत्यू

फॉरेन्सिक पथक, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तपास सुरू

पंजाबच्या गुरुदासपूर जिल्ह्यात मध्यरात्री पोलीस चौकीत तैनात असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. दोरांगला पोलीस स्टेसनच्या हद्दीत रात्री १ वाजता ही घटना घडली. दोघांवर कोणी गोळी झाडली, याची माहिती समोर आलेली नाही. दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांच्या बंदूक ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास पथकाने मोबाईल फोनचा तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. अशोक कुमार असे होमगार्डचे नाव आहे. तर गुरनाम सिंह असे सहाय्यक उपनिरीक्षकाचे नाव आहे. दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच गुरदासपूरचे एसएसपी आदित्य शर्मा घटनास्थळी पोहोचले. फॉरेन्सिक टीमने देखील घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. बीएएसएफचे डिआयजी जेके विरदी देखील घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी सांगितलं की, दोघांचे मृतदेह एका खोलीत सापडले. पोलिसांकडून वेगवेगळ्या बाजूने तपास सुरू करण्यात आला आहे.

दोघांवर गँगस्टर किंवा गुंडांनी हल्ला केला आहे का, याचा अनुषंगानेही तपास सुरु करण्यात आला आहे. पथकाकडून एक एक पुरावा गोळा करण्याचं काम सुरू आहे. विरोधी पक्ष काँग्रेसने आम आदमी पक्ष सरकारच्या राज्यातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

पंजाब काँग्रेस अध्यक्ष अमरिंदर सिंह राजा यांनी सोशल मीडियावर लिहिलं आहे की, 'अत्यंत चिंतेचा विषय आहे. गुरदासपूर जिल्ह्याच्या अधियान गावातील चेकपोस्टच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. दोन्ही कुटुंबीताल कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबाप्रति संवेदना व्यक्त करतो. राज्य आणि केंद्र सरकारने या हत्याकांडाचा तपास करावा. दोषींवर कडक कारवाई करावी'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna: महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये हमरी तुमरी

भाजपचा वटवृक्ष कार्यकर्त्यांच्या संघर्षातून उभा राहिलाय: रविंद्र चव्हाण

Nanded Crime: सोनू कल्याणकरच्या हत्या प्रकरणी मोठी अपडेट; हत्येमागील धक्कादायक कारण आलं समोर

PM Kisan yojana : ही गोष्ट केली तरच पीएम किसान योजनेचा हफ्ता मिळणार, शेतकर्‍यांच्या कामाची गोष्ट

बारामती पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच लक्ष्मण हाकेंच्या माघारीनंतरही नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT