Earthquake saam Tv
देश विदेश

Earthquake: थरारली धरणी...आसामसह त्रिपुरा आणि मेघालय भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी हादरले!

Earthquake: आसाम, मेघालय आणि त्रिपुरामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की लोकं घाबरून घराबाहेर पळाले.

Bharat Jadhav

Earthquake:

आसाम, मेघालय आणि त्रिपुरामध्ये आज संध्याकाळच्या सुमारास भूकंपाचे तीव्र धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर ५.२ इतकी नोंदली गेली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, आज संध्याकाळी ६.१५ वाजता मेघालयसह तिन्ही राज्यांत भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. उत्तर गारो हिल्समध्ये केंद्रबिंदू होता. या भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की काही लोक भीतीनं घराबाहेर पळाले.

ईशान्येत भूकंपाचे धक्के जाणवणं हे एका महिन्यात सलग दुसऱ्यांदा घडलंय. याआधी ११ सप्टेंबर रोजी आसामसह ईशान्येकडील अनेक राज्यांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. नॅशनल सिस्मॉलॉजी सेंटरच्या म्हणण्यानुसार, रात्री ११ वाजता भूकंप झाला होता. त्याची तीव्रता रिक्टर स्केलवर ५.१ इतकी नोंदवली गेली होती. त्या भूकंपाचा केंद्रबिंदू उखरुल जिल्हा होता. हा केंद्रबिंदू मणिपूरपासून ६६ किमी अंतरावर होता.

परंतु हे भूकंप आसाम तसेच अरुणाचल प्रदेशातही जाणवले होते. नॅशनल सिस्मॉलॉजी सेंटरच्या मते सप्टेंबरमध्ये झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू पृथ्वीच्या २० किमी खोलीवर होता. हरियाणामध्ये एक दिवसापूर्वी भूकंपाचे धक्के जाणवले होते. राष्ट्रीय भूकंप केंद्रानुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू रोहतक होता. त्याची तीव्रता रिक्टर स्केलवर २.६ इतकी नोंदवली गेली होती. रात्री अंदाजे ११.२६ मिनिटांनी भूकंपाचे हे धक्के जाणवले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापूरात ऊस दरासाठी असलेल्या आंदोलनात पोलिसांकडून आंदोलकांना धक्काबुक्की

Methi Thepla Recipe : नाश्त्यासाठी बनवा गुजरात स्पेशल मेथी थेपला, झटपट तयार होते रेसिपी

मुंबईत अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; आता राजकीय दबावाचा नवा वाद, नेमकं काय घडलं?

Success Story: लहानपणी आईवडिलांचे छत्र हरपलं, आजीने मोठं केलं, सलग ५ वेळा अपयश, ६व्या प्रयत्नात IPS; अंशिका जैन यांचा प्रवास

Oldest Forts In India: भारतातील सगळ्यात जूने किल्ले कोणते? जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT