Assam Fire News
Assam Fire News ANI
देश विदेश

Assam News : बाजारपेठेत भीषण आग; ३०० हून अधिक दुकानं जळून खाक, मन हेलावणारा व्हिडीओ आला समोर

Ruchika Jadhav

Assam Fire News : आसाममध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. गुरुवारी रात्री आसामच्या जोरहाट बाजारपेठे परिसरात भीषण आग लागली. या आगीत बाजापेठेतील अनेक दुकानं जळून खाक झाली आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. दुकानं आणि त्यातील सामानाने पेट घेतल्याने रात्री १ वाजेपर्यंत ही आग विझवण्याचे काम सुरू होते. या घटनेत ३०० च्या आसपास दुकानांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

आग नेमकी कशी लागली?

आसामच्या जोरहाट परिसरात मोठी बाजारपेठ आहे. गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास येथील एका कपड्यांच्या दुकानाला आग लागली. दुकानात कपड्यांना आग लागल्याने ही आग वाऱ्याच्या वेगाने पसरत गेली. या घटनेत येथील अन्य दुकानांना देखील आग लागली. हवेचा जोर असल्याने परिसरातील इतर दुकानांनी देखील पेट घेतला. एकून ३०० दुकानं या आगीत जळून खाक झाली आहेत. यात दिलासादायक बाबम्हणजे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मोठ्या प्रमाणावर आग पसरत चालल्याने आग (Fire) आटोक्यात आणण्याचे मोठे आव्हान अग्निशमन दलाच्या जवानांवर होते. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाची २५ हून अधिक वाहने घटनास्थळी दाखल झाली होतीस. मात्र दुकानातील सामानानेही पेट घेतल्याने आगीचे लोट दूरवर हवेत पसरलेले दिसत होते.

जोरहाट बाजारपेठेतील रस्ता अरूंद असल्याने याचा त्रास अग्निशमन दलाच्या वाहनांना येथे पोहचण्यास अडचणी आल्या. परिणामी वाहने वेळेवर पोहचू शकली नाहीत. त्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Thackeray Group : ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात!

Ghee Benefits: रोज एक चमचा तूप खा अन् आरोग्याच्या समस्या दूर करा

Maharashtra Lok Sabha Voting Live: ओशिवारामध्ये भाजप-ठाकरे गट आमने-सामने

Control Sugar Level : सकाळी उठल्यावर शुगर वाढतेय; रात्री झोपण्याआधी 'ही' कामे करा डायबिटीज कंट्रोलमध्ये राहिल

Electric Shock : थंड पाणी भरताना वॉटर कुलरमधून विजेचा धक्का; तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT