Bhiwandi News : भिवंडीत कारखान्याला भीषण आग; पाहा थरकाप उडवणारा व्हिडीओ

मात्र तोपर्यंत कारखाना पूर्णपणे जळून खाक झाला.
Bhiwandi News
Bhiwandi News Fayyaj Shaikh
Published On: 

फय्याज शेख

Bhiwandi News : भिवंडी शहरात गुरुवारी मध्यरात्री एक मोठी दुर्घटना घडली. देवजीनगर परिसरात असलेल्या यंत्रमाग कारखान्यास भीषण आग लागली होती. मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. आगीत संपूर्ण कारखाना जळून खाक झाला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. मात्र तोपर्यंत कारखाना पूर्णपणे जळून खाक झाला. यात कारखाना मालकाचे लाखोंचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीत हानी झालेली नाही. (Latest Bhiwandi Fire News)

मुंबईत सातत्याने आग लागण्याच्या घटना घडत आहेत. फ्रेब्रुवारी महिन्यात अनेक शहरांत कारखान्यांना आग लागल्याची माहिती समोर आली आहे.

Bhiwandi News
Mumbai Fire : अंधेरी MIDC परिसरात बंद फ्लॅटमध्ये आग; इमारतीतील रहिवाशांना सुखरूप बाहेर काढले

धावत्या लोकल ट्रेनच्या चाकाला आग

गुरुवारी मध्य रेल्वेच्या कसारा सीएसटी लोकल ट्रेनने पेट घेतला होता. ही ट्रेन कसाऱ्याहून मुंबई सीएसटीकडे जात होती. कसाऱ्याहून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी ट्रेन ही कसाऱ्याहून सकाळी 8:18 ला सुटली होती. या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Bhiwandi News
Mumbai Fire News : मुंबईत अग्नितांडव! कुर्ल्यात इमारतीला भीषण आग; एका महिलेचा मृत्यू

ट्रेन असनगाव ब्रीज जवळ आल्यावर या ट्रेनमधून अचानक धूर निघू लागला. यामुळे ट्रेनमध्ये बसलेल्या प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र 15 ते 20 मिनिटांनंतर पुन्हा ही ट्रेन मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने रवाना झाली. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

सांगलीत वखारीस भीषण आग

काल सांगाली येथे अशीच एक घटना घडली. सांगलीच्या टिंबर एरियामध्ये माळी वखारीस भीषण आग लागली होती. या आगीची माहिती कळताच फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केले होते. त्यानंतर घटनास्थळी चार ते पाच अग्निशमन बंबांना पाचारण करण्यात आले. वखार असल्यामुळे आणि लाकडं असल्यामुळे आगीचे भीषण रूप पाहायला मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.