Mumbai Fire : अंधेरी MIDC परिसरात बंद फ्लॅटमध्ये आग; इमारतीतील रहिवाशांना सुखरूप बाहेर काढले

Mumbai Fire News : मुंबईच्या अंधेरी पूर्वेकडील एमआयडीसी परिसरात बंद फ्लॅटला आग लागली.
Mumbai Fire News
Mumbai Fire NewsSaam TV
Published On: 

संजय गडदे

Mumbai Fire News : मुंबईतील आगीच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. अंधेरी पूर्वेकडील एमआयडीसी परिसरात इमारतीतील बंद घरामध्ये आज, बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास मोठी आग लागली. जवळपास तासभर ही आग धुमसत होती.

मुंबईतील आगीच्या घटनांचे सत्र सुरूच असून, अंधेरी पूर्वेकडील एमआयडीसी परिसरातील बंद घराला आग लागली. बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही भीषण आग लागली. (Latest News In Mumbai)

आगीच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी पोहोचले. जवळपास तासभर आग धुमसत होती. तासाभरानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.

बंद घर असल्यामुळे सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. पण संपूर्ण घर या आगीमध्ये जळून खाक झाले आहे. अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी खबरदारी म्हणून इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना सुखरूप बाहेर काढले.

त्यानंतर फायर कुलिंगचे काम हाती घेण्यात आले. ही आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत अग्निशमन दलाकडून अधिक चौकशी करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.