Assam Crime News  Saam Tv
देश विदेश

Crime: बॉयफ्रेंडच्या समोर तरुणीवर सामूहिक बलात्कार, कार अडवून आधी दोघांना मारहाण, नंतर...

Assam Crime News: आसाममध्ये बॉयफ्रेंडसोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणीसोबत भयंकर घडलं. ७ तरुणांनी या दोघांना मारहाण केली. त्यानंतर बॉयफ्रेंडच्या समोरच तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला.

Priya More

Summary -

  • बॉयफ्रेंडच्या समोर तरुणीवर सामूहिक बलात्कार

  • आसामच्या कछार जिल्ह्यातील सिलचर येथे घडली घटना

  • सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल

  • दोन आरोपींना पोलिसांनी केली अटक

बॉयफ्रेंडच्या डोळ्यासमोर एका तरुणीवर ७ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. आसामच्या कछार जिल्ह्यात ही हादरवून टाकणारी घटना घडली. २८ वर्षीय तरुणी बॉयफ्रेंडसोबत फिरण्यासाठी गेली होती. त्यावेळी ही भयंकर घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी सातही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. तर उर्वरीत फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कछार जिल्ह्यातल्या सिलचर येथे ही घटना घडली. पीडित तरुणी आपल्या बॉयफ्रेंडसोबत फिरण्यासाठी कारने बायरपास रोडवर गेली होती. त्याठिकाणी ते कार रस्त्याच्या कडेला उभे राहून थांबले होते. त्याचवेळी काही तरुण त्याठिकाणी एका कारमधून आले. त्यांनी तरुणी आणि तिच्या बॉयफ्रेंडला आधी मारहाण केली. त्यानंतर तरुणीवर त्यांनी आळीपाळीने बलात्कार केला. ऐवढ्यावरच आरोपी थांबले नाही तर त्यांनी पीडितेच्या बँक खात्यातून १० हजार रुपये जबरदस्ती ट्रान्सफर करून घेतले. त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.

या घटनेनंतर घाबरलेल्या पीडित तरुणीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी सातही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरू केला. पोलिसांनी आतापर्यंत दोघांना अटक केली. तर इतर ५ जणांचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे आसाममध्ये खळबळ उडाली. आरोपींविरोधात कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonu Sood On Kangana Ranaut: 'जनता देव असते, बोलण्याआधी विचार करा'; कंगना रणौतच्या Gen Z वक्तव्यावर सोनू सूदचा टोला

Maharashtra News Live Update: नालासोपारा येथील रिसॉर्टमध्ये दारूच्या पार्टीदरम्यान हवेत गोळीबार

Monsoon Hydration: पावसाळ्यात थकवा, चक्कर आणि वाताचा त्रास वाढलाय? डॉक्टरांनी सांगितलेल्या या सवयी आत्ताच करा फॉलो

VIDEO : आता फक्त प्रधानांचा राजीनामा घेतलाय, उद्या सरकारही बदलतील; अभिजीत दिपकेंचा थेट इशारा

Hair Care: लहानपणी होते तसे दाट, लांबसडक आणि चमकदार केस हवेत? मग घरीच करा 'हा' सोपा उपाय

SCROLL FOR NEXT