asim munir  Saam tv
देश विदेश

Asim Munir : ट्रम्पच्या कुबड्यांवर मुनीरच्या बेडूक उड्या;पाकचा हिटलर अमेरिकेत बरळला, VIDEO

asim munir news : पाकिस्तानचा लष्करप्रमुख असीम मुनीरनं पुन्हा एकदा जगाला संपवण्याची पोकळ धमकी दिलीय. मुनीरनं हे विधान नेमकं कुठे केलं? भारतानं मुनीरला कसं चोख प्रत्युत्तर दिलयं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Snehil Shivaji

पाकिस्तानच्या लष्कराचा फक्त सर्वसामान्य पाकिस्तान्यांना आणि भारतीयांनाच त्रास आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकताय. कारण पाकच्या लष्करप्रमुखानं जगाला संपवण्याचं विखारी स्वप्न पाहिलंय. आणि याच स्वप्नाला सत्यात उतरवण्याचे मनसुबे जगाची महासत्ता म्हणवणाऱ्या अमेरिकेतून जाहिरही केलेत. आपल्या डोक्यात तर मेंदू नाहीच पण गुडघ्यातही मेंदू नाही हे पाकच्या लष्कर प्रमुखानं पुन्हा कसं सिद्ध केलंय पाहा..अमेरिकेच्या कुबड्यांवर मुनीरनं काय पोकळ धमकी दिली आहे ती.

काय म्हणाला असीम मुनीर?

आपण बुडणार असं वाटलं तर आम्ही अर्ध्या जगाला बरोबर घेऊन जाऊ

अमेरिकेच्या भूमीवरुन भारतावर अणुबॉम्ब टाकण्याची अप्रत्यक्ष धमकी

पाकिस्तानच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला तर अणुशस्त्रांचा वापर करणार

भारताच्या निर्णयामुळे पाकिस्तानच्या 25 कोटी लोकांना उपासमारीचा धोका

भारतानं सिंधूवर धरण बांधलं तर ते 10 मिसाइल्स टाकून उडवून देणार

मात्र यापूर्वीच मोदींनी अण्वस्त्रांच्या धमकीला भीक घालत नसल्याचं पाकला ठणकावून सांगितलं होतं. त्यामुळे पाकिस्तान हा दुसऱ्याच्या बळावर उड्या मारणारा देश आहे. कधी चीन तर कधी तुर्की तर कधी अमेरिका. पाकिस्तानमध्ये उघ़डपणे युद्ध करण्याची हिंमत नाही..मात्र स्वप्नं जगाची राख करण्याची आहेत.

जगातील दिवाळखोर देश, चीनी कर्जाचा डोंगर, तुर्कीच्या लष्करी बळावर चीनी शस्त्रांच्या भरवशावर असीम मुनीर सारख्या दात नसलेल्या सर्कशीतील वाघाच्या डरकाळीनं पाकिस्तानं पुन्हा एकदा स्वताचं हसं करुन घेतलंय. हे पुन्हा सिद्ध झालंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PF खात्यातून पैसे काढणं झालं सोपं; UPIमधून किती आणि कधी काढू शकणार पैसे? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Badami Heritage: स्वर्गाहून सुंदर! कमी बजेटमध्ये मुंबई–पुण्याला फिरणं सोडा, विकेंडला करा बदामी ट्रिप प्लान

Crime News : परदेशात गलेलठ्ठ पगाराचं प्रलोभन, कंपनीत नको ते करायला लावलं; ४ महिने अगणित छळ, कोकणातील तरुणासोबत भयंकर घडलं

महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यात 4 तासांत एकापाठोपाठ 9 भूकंपाचे धक्के; लोकांमध्ये भीतीचं वातावरण

Himachal Pradesh bus accident : खासगी बस दरीत कोसळली, ८ जणांचा मृत्यू; अनेक प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT