Brunei Prince Weeding: Instagram
देश विदेश

Brunei Prince Weeding: राजकुमाराने केलं सर्वसामान्य कुटुंबातील तरुणीशी लग्न, 1788 खोलींच्या अलिशान महालात रंगला विवाह सोहळा, Photos

brunei Prince Weeding Photos: आशियातील ब्रनेई येथील राजकुमार अब्दुल मतीन हे अखेर लग्न बंधनात अडकले आहेत. याच ब्रनेई देशातील बंदार सेरी बेगावन येथील एका सर्वसामान्य कुटुंबातील तरुणीशी राजकुमार अब्दुल यांनी लग्नगाठ बांधली आहे.

Vishal Gangurde

Brunei Prince Abdul Mateen Wedding:

आशियातील ब्रनेई येथील राजकुमार अब्दुल मतीन हे अखेर लग्न बंधनात अडकले आहेत. याच ब्रनेई देशातील बंदार सेरी बेगावन येथील एका सर्वसामान्य कुटुंबातील तरुणीशी राजकुमार अब्दुल यांनी लग्नगाठ बांधली आहे. राजकुमार अब्दुल यांचा शाही लग्नाचा सोहळा १० दिवस चालणार आहे. या शाही विवाहाची जगभर चर्चा सुरु आहे. (Latest Marathi News)

३२ वर्षांचे राजकुमार अब्दुल मतीन यांचा विवाह २९ वर्षीय अनीशा रोस्ना ईसा-कालेबिक या तरुणीशी झाला. या दोघांचा शाही विवाह हा १६ जानेवारीला समाप्त होणार आहे. राजकुमार मतीन हे उत्कृष्ट पोलो खेळाडू आहेत. तसेच ते व्यावसायिक हेलिकॉप्टर पायलट आहेत. तरुणींमध्ये राजकुमार अब्दुल हे चांगलेच प्रसिद्ध आहेत. इन्टाग्रामवर त्यांचे २५ लाख फॉलोवर्स आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जगातील सर्वात श्रीमंत राजघराणे

ब्रुनेई देशातील शाही कुटुंबाची एकूण मालमत्ता २८ अब्ज डॉलर इतक्या रुपयांची आहे. राजकुमार अब्दुल मतीन यांचं घराणे जगातील श्रीमंत राजघराण्यापैकी एक आहे. शाही कुटुंबातील राजकुमार मतीन यांच्यापेक्षाही घरात ६ जण मोठे आहेत.

ते ६ जण राजघराण्यातील सिंहासनाचे दावेदार आहेत. त्यामुळे त्यांची त्यांच्या पित्याच्या निधनानंतर राजगादीवर बसण्याची शक्यता कमी आहे. पण डॅशिंग लूकमुळे अब्दुल मतीन सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहेत.

मतीन यांची पत्नी ईसा-कालेबिक ही रॉयल ब्रुनेई एयरलाइन्सचे संस्थापक अध्यक्ष यांची नात आहे. तसेच ईसा-कालेबिक ही कथित सिल्क कलेक्टिव नावाच्या एक फॅशन ब्रँड चालवते.

१७८८ खोल्यांच्या महालात रंगणार विवाह सोहळा

राजकुमार मतीन यांची लग्नसोहळा १७८८ खोल्यांच्या अलिशान महालात रंगला. राजकुमार अब्दुल यांचा विवाह झाल्यानंतर लोकांनी राजकुमार आणि राजकुमारीचं अभिनंदन केलं. १० दिवसांच्या शाही विवाह सोहळ्यात जगभरातील राजघराण्यातील व्यक्ती आणि मोठे नेते हजेरी लावण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RITES Recruitment: सरकारी नोकरीची संधी! RITES मध्ये भरती सुरु; पगार किती? अर्ज कसा करावा? वाचा सविस्तर

पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये पुन्हा संघर्षाचा भडका, दोन्ही देशांकडून तुफान गोळीबार

Modi Cabinet Meeting : मोदी सरकारचा मोठा निर्णय; दोन टप्प्यात होणार जनगणना, 11 हजार 718 कोटींचा बजेट मंजूर

Maharashtra Live News Update: निलेश घायवळ हजर झाला नाही तर त्याची सर्व मालमत्ता जप्त करणार- पोलिसांचा इशारा

Jahnavi Killekar Photoshoot: निळं आकाश अन् निळी बिकनी, जान्हवीचे बोल्ड फोटो पाहून थायलंडचं वातावरण तापलं

SCROLL FOR NEXT