india Alliance News
india Alliance NewsSaam tv

India Alliance: इंडिया आघाडीची ताकद वाढणार? काँग्रेस आणखी एका बड्या पक्षाला आघाडीत सामील करण्याच्या प्रयत्नात

india Alliance News : विरोधकांच्या इंडिया आघाडीला आगामी लोकसभेच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. इंडिया आघाडीचे नेते आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पक्षाला आघाडीत सामील करण्यात प्रयत्नात आहेत.
Published on

india Alliance:

विरोधकांच्या इंडिया आघाडीला आगामी लोकसभेच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. इंडिया आघाडीचे नेते आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पक्षाला आघाडीत सामील करण्यात प्रयत्नात आहेत. काँग्रेसचे काही नेते १५ जानेवारीला मायावतींना वाढदिवसानिमित्त भेटण्यासाठी जाऊ शकतात. काँग्रेस नेते मायावतींना (Mayavati) वाढदिवसाच्या शुभेच्छा देत इंडिया आघाडीत सामील होण्याविषयी चर्चा करू शकतात. यानंतर काँग्रेस समाजवादी पक्षाशी चर्चा करण्याची शक्यता आहे, असं वृत्त सूत्रांनी दिलं आहे. (Latest Marathi News)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून आता जागावाटपाची चर्चा सुरु आहे. उत्तर प्रदेशमधील लोकसभा मतदारसंघाच्या जागावाटपावर काँग्रेस आणि समाजवादी पक्षात चर्चा सुरु आहे. मात्र, उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाने काँग्रेसला कमी जागा दिल्या तर काँग्रेस नेते बसपाशी (BSP Party) युती करून निवडणूक लढण्याची त्यांची इच्छा आहे.

समाजवादी पक्ष आणि काँग्रेसमध्ये शुक्रवारी होणारी बैठक अचानक रद्द करण्यात आली आहे. शुक्रवारी चार वाजता समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये बैठक होणार होती. मात्र, काही कारणात्सव ही बैठक रद्द करण्यात आली आहे. ही बैठक १५ जानेवारीला होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या दिवशी मायवतींची भेट घेऊन काँग्रेस नेते समाजवादी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत.

काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची बैठक का रद्द झाली?

काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची बैठक रद्द होण्याविषयी भाष्य करताना सपा नेते म्हणाले की, प्रदेश अध्यक्ष आणि प्रभारींचा बैठकीसाठी काही अभ्यास करायचा होता. पण तो झाला नाही. एका कार्यक्रमामुळे समाजवादीचे उत्तर प्रदेशाध्यक्ष दिल्लीत पोहोचू शकले नाही. यामुळे आज शुक्रवारची बैठक रद्द झाली'. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोण पक्ष किती जागांवर निवडणूक लढणार? काय आहे यूपीचा फॉर्म्युला?

तत्पूर्वी, मंगळवारी इंडिया आघाडीत सामील असलेल्या उत्तर प्रदेशमधील पक्षांमध्ये बैठक झाली. या बैठकीत समाजवादी पक्षाने ६० हून अधिक जागांवर निवडणुका लढण्याची इच्छा व्यक्त केली . तर बाकी जागा आघाडीतील इतर पक्षांना देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यात काँग्रेसचाही सामावेश आहे. मात्र, या प्रस्तावाला काँग्रेसने नकार दिला असून यूपीच्या जागावाटपाबद्दल कोणतीही चर्चा झाली नसल्याचं म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com