Mahila Samman Yojana  Scroll
देश विदेश

Mahila Samman Yojana: 'लाडकी बहीण' दिल्लीतही गाजणार, महिलांना मिळणार २१०० रुपये; सरकारचं आश्वासन

Mahila Samman Yojana: आम आदमी पक्षाने दिल्लीत महिला सन्मान निधी योजनेंतर्गत मोठी घोषणा केलीय. दिल्ली सरकारने आपलं आश्वसन पूर्ण करत महिलांच्या बॅक खात्यात प्रत्येक महिन्याला १००० रुपये देण्याच्या योजनेला मंजुरी दिलीय.

Bharat Jadhav

महाराष्ट्रातील महायुतीप्रमाणे दिल्लीतील सरकारनेही महिलांसाठी आर्थिक साहाय्य करणारी योजना सुरू केलीय. आम आदमी पक्षाचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी महिला सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत मोठी घोषणा केलीय. दिल्ली सरकारने आपलं आश्वसन पूर्ण करत महिलांच्या बँक खात्यात प्रत्येक महिन्याला १००० रुपये आर्थिक साहाय्य देण्यास मंजुरी दिलीय. मंत्रिमंडळाच्या बैठकीत आतिशी यांच्या अध्यक्षतेखाली या योजनेचा प्रस्ताव सादर करण्यात आला.

आता दिल्लीच्या महिलांना या योजनेसाठी आपल्या नावांची नोंदणी करावी लागले. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यात रक्कम पाठवली जाणार आहे. या योजनेसंदर्भात दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिलीय. महिला आणि मातांसाठी हे ऐतिहासिक पाऊल असल्याचे अरविंद केजरीवाल म्हणालेत. या योजनेमुळे दिल्लीतील महिलांना आर्थिक बळ मिळेल, असे ते म्हणाले.

नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल. दरमहा १००० रुपये थेट योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात हस्तांतरित केले जातील. महिलांचा सन्मान आणि सशक्तीकरण वाढवण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

निवडणूक जिंकल्यानंतर दिले जातील २१०० रुपये

केजरीवाल यांनी महिलांसाठीच्या नव्या योजनेअंतर्गत उद्यापासून नोंदणी सुरू होणार असल्याची घोषणा केली. या योनजेच्या अंतर्गत निवडणूक जिंकल्यानंतर महिलांना १००० रुपयांऐवजी २१०० रुपये दिले जातील. महिला कुटुंब चालवतात, मुलांवर चांगले संस्कार करतात आणि त्यांचे संगोपन करतात. सरकार त्यांना थोडी मदत करू शकत असेल तर ती भाग्याची गोष्ट मानायला हवी, असं केजरीवाल म्हणालेत.

हिंदू धर्माचा उल्लेख करत केजरीवाल म्हणाले, जिथे महिलांची पूजा केली जाते, तिथे देव वास करतात. या योजनेमुळे दिल्ली सरकारला खर्च होणार नाही तर केवळ आशीर्वाद मिळेल. काही लोक ही योजना अशक्य मानत होते, पण मी जे काही ठरवतो ते मी पूर्ण करतो, असं केजरीवाल म्हणालेत. दिल्लीच्या दोन कोटी लोकांसोबत मिळून आपण सर्वात मोठे अडथळे पार करून प्रत्येक काम यशस्वीपणे पूर्ण करू असा ग्वाहीही केजरीवाल यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

BJP National President: भाजपला पहिल्यांदा मिळू शकतात महिला राष्ट्रीय अध्यक्ष, ३ नावं आहेत चर्चेत

Shirdi : साई संस्थानची बदनामी केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार | VIDEO

Sara Tendulkar: सचिन तेंडुकरच्या लाडक्या लेकीचे नविन ग्लॅमरस फोटो तुम्ही पाहिलेत का?

New Electric Bike Launch : बाईक रायडर्ससाठी गुड न्यूज! फक्त २५ पैशांमध्ये १ किमी धावेल ही इलेक्‍ट्रिक टू-व्हीलर, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT