Sanjay Singh Saam Tv
देश विदेश

Sanjay Singh: केजरीवालांना फसवण्यात आलं, खरा मद्य घोटाळा भाजपने केला, संजय सिंह यांचा गंभीर आरोप

Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात आम आदमी पक्षाने रविवारी जंतरमंतरवर 'सामूहिक उपोषण' केले. यावेळी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

साम टिव्ही ब्युरो

Sanjay Singh On News:

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात आम आदमी पक्षाने रविवारी जंतरमंतरवर 'सामूहिक उपोषण' केले. यावेळी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

यावेळी आप कार्यकर्त्यांना संबोधित करताना राज्यसभा खासदार आणि नुकतेच सुप्रीम कोर्टातून जामीन मिळाल्यानंतर 6 महिन्यांनंतर तुरुंगातून सुटलेले संजय सिंह यांनी ईडी-सीबीआयसह भाजपला चांगलेच धारेवर धरले. यासोबतच संजय सिंह यांनी भाजपच्या 'मोदीची गॅरंटी' या घोषणेवरही टीका केली.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

संजय सिंह यांनी कथित मद्य घोटाळ्यावरून भाजपवर जोरदार हल्ला चढवला आणि दिल्लीच्या नायब राज्यपालांना भाजप नेत्यांना तुरुंगात टाकण्याचे आव्हान केले. भाजपच्या खात्यात 55 कोटी रुपयांची रक्कम सापडल्याचा आरोप संजय सिंह यांनी केला आहे.  (Latest Marathi News)

यासोबत सिंह यांनी अरबिंदो फार्मा यांनी दिलेल्या देणग्यांचा उल्लेख केला, ज्यांचे संचालक आणि प्रवर्तक सरथ चंद्र रेड्डी यांना याच प्रकरणात अटक करण्यात आली होती. रेड्डी नंतर या प्रकरणात सरकारी साक्षीदार बनले आणि पुढे त्यांना जामीन मंजूर झाला.

जंतर-मंतरवर सभेला संबोधित करताना संजय सिंह म्हणाले, "तुमच्यात (एलजी) जराही नैतिकता उरली असेल तर पत्र लिहा, भाजप नेत्यांना तुरुंगात टाका, त्यांनी मद्य घोटाळा केला आहे." संजय सिंह यांनी भाजपला स्वतंत्र भारतातील सर्वात भ्रष्ट पक्ष सांगत 'मोदींची गॅरंटी' या घोषणेची खिल्ली उडवली. सर्व भ्रष्ट नेत्यांना पक्षात सामावून घेण्याची मोदी गॅरंटी देत ​​असल्याचे संजय सिंह म्हणाले.

संजय सिंह म्हणाले की, ईडी-सीबीआयकडे 456 साक्षीदार आहेत. दोन्ही तपास यंत्रणांनी 50 हजार पानांची चार्जशीट तयार केली आहे. यातच 456 साक्षीदारांपैकी केवळ 4 साक्षीदारांनी अरविंद केजरीवाल यांचे नाव घेतले आहे. कोणत्या परिस्थितीत आणि दबावाखाली त्यांनी अरविंद केजरीवाल यांचे नाव घेतले, हे आता कोणापासून लपून राहिलेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mrunal Dusanis: ४ वर्षांनी मायदेशी परतली, आधी मालिकेत पुनरागमन अन् आता नवऱ्यासोबत व्यवसायात पदार्पण;मृणाल दुसानिसचं मोठं पाऊल

IND vs AUS: चेतेश्वर पुजाराची बॉर्डर- गावसकर ट्रॉफीत एन्ट्री! या नव्या भूमिकेत दिसणार

Nikhil Rajshirke: बिग बॉस मराठी फेम अभिनेत्यानं केलं लग्न; निखिल राजेशिर्केची पत्नी कोण?

Maharashtra politics : प्रचारापासून मला रोखण्याचा प्रयत्न, वारीस पठाण ढसाढसा रडले, पाहा व्हिडीओ

Delhi Capitals: दिल्लीच्या नव्या कर्णधाराचं नाव ऐकून व्हाल हैराण; ऋषभ पंतनंतर कोण सांभाळणार कमान?

SCROLL FOR NEXT