Lok Sabha Elections: भारताकडे वाईट नजरेने पाहणाऱ्यांना आता पीठ मिळेना; प्रचारसभेतून पीएम मोदींचा पाकिस्तानवर हल्लाबोल

PM Modi Election Rally: : लोकसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्षांच्या प्रचार सभा सुरू झाल्यात. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारात उतरले असून या प्रचार सभेतून त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय. बिहारमधील निवडणूक प्रचारात संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानवर हल्लाबोल केलाय.
Lok Sabha Elections: भारताकडे वाईट नजरेने पाहणाऱ्यांना आता पीठ मिळेना;  प्रचारसभेतून पीएम मोदींचा पाकिस्तानवर  हल्लाबोल

Lok Sabha Election PM Modi In Nawada: 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराचा धुमधडका लावलाय. बिहारमधील एका प्रचार सभेत भाजपसाठी मत मागताना त्यांनी विरोधकांवर टीका केली. प्रचार सभेत नागरिकांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी विरोधकांसह पाकिस्तानवर हल्लाबोल केला. बिहारमधील नवाद येथे सभेत संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी नाव न घेता पाकिस्तानवर टोला मारलाय. मोदीने गॅरंटी दिली होती की, भारताकडे वाईट नजरेने पाहणाऱ्यांना धडा शिकवला जाईल. आता देशाकडे वाईट नजरेने पाहणाऱ्यांना आता पीठासाठी वणवण फिरावे लागत आहे.(Latest News)

काँग्रेसने शनिवारी निवडणुकीचा जाहीरनामा प्रकाशित केला. त्यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी चीन , पाकिस्तानच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. खरगे यांच्या टीकेला पंतप्रधान मोदींनी बिहारमधील नवादच्या प्रचार सभेत उत्तर दिलंय. पंतप्रधान मोदी राजस्थान येऊन जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित करतात असंही खरगे म्हणाले होते. त्यावर बोलताना मोदी म्हणाले की, काँग्रेस अध्यक्ष हे तुकडे-तुकडे गॅगची सदस्य आहेत. ते असं बोलत आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

खरगे यांनी देशाच्या शहीद सैनिकांचा अपमान केलाय. मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर टीका करताना मोदी म्हणाले मोदी यांची गॅरंटी इंडिया आघाडीच्या नेत्यांना आवडत नाहीत. इंडिया आघाडीमधील एक नेता म्हणाला की, पंतप्रधान मोदी ज्या गॅरंटी देत आहेत त्यावर बंदी घातली पाहिजे. मोदी यांनी गॅरंटी देणं हे अवैध असल्याचं ते म्हणतात.

माझ्या गॅरंटीला इतके घाबरलेत का? मोदींच्या गॅरंटीला घाबरलात का? असे प्रश्नही पंतप्रधान मोदींनी केलेत. मोदी गॅरंटी यासाठी देतो, कारण आपल्याकडे गॅरंटी पूर्ण करण्याची ताकद आहे. गॅरंटी पूर्ण करण्यासाठी आपण खूप मेहनत घेत असल्याचं मोदी खरगे यांच्यावर हल्लाबोल करताना म्हणालेत.

इंडिया आघाडी म्हणजे देशविरोधी लोकांचे माहेरघर असल्याची टीका देखील पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केली. इंडिया आघाडी भारताच्या फाळणीबद्दल बोलत आहेत. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मुस्लिम लीगची छाप दिसते. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात मुस्लीम मतांचे धु्व्रीकरण करत असल्याचं मोदी म्हणालेत.

Lok Sabha Elections: भारताकडे वाईट नजरेने पाहणाऱ्यांना आता पीठ मिळेना;  प्रचारसभेतून पीएम मोदींचा पाकिस्तानवर  हल्लाबोल
Eknath Khadse: 'होय, मी भाजपात जाणार', एकनाथ खडसेंची होणार भाजपमध्ये घरवापसी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com