Eknath Khadse: 'होय, मी भाजपात जाणार', एकनाथ खडसेंची होणार भाजपमध्ये घरवापसी

Maharashtra politics News: ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार असल्याचं चित्र आहे. शरद पवार गटाचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे हे घरवापसी करत पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
'होय, मी भाजपात जाणार', एकनाथ खडसेंची होणार भाजपमध्ये घरवापसी
Eknath KhadseSaam Tv

>> सुरज मसुरकर

Eknath Khadse News:

ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार असल्याचं चित्र आहे. शरद पवार गटाचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे हे घरवापसी करत पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. त्यांनी स्वतः साम टीव्हीशी बोलताना या बातमीला दुजोरा दिला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपमध्ये अशी चर्चा आहे की, एकनाथ खडसे भाजपमध्ये परतले तर उत्तर महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक लढवण्यात मोठी मदत होईल. यातच काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांची दिल्लीवारी झाली होती. त्यांनी तेव्हा असं सांगितलं होतं की, काही कोर्टाची कामे आहेत, म्हणून दिल्लीत आलो आहे. मात्र आता अशी माहिती समोर आली आहे की, दिल्लीत ते भाजप प्रवेशाबद्दल चर्चा करण्यासाठीच गेले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'होय, मी भाजपात जाणार', एकनाथ खडसेंची होणार भाजपमध्ये घरवापसी
Ashok Chavan: अशोक चव्हाण यांनी घेतली राज्यसभेचे खासदार म्हणून शपथ

एकनाथ खडसे यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे, निश्चित झालं असलं तरी, ते नेमक्या कोणत्या तारखेला भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. त्याला भाजपच्या वतीने कोणती नवीन जबाबदारी दिली जाऊ शकते, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. असं असलं तरी साम टीव्हीशी बोलताना एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे की, माझा भाजपमध्ये प्रवेश निश्चित आहेत.  (Latest Marathi News)

याचबद्दल बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ''एकनाथ खडसे याचं भाजपमध्ये येण्याचं मत झालं आहे. सध्या त्यावर केंद्रीय समिती विचार करत आहे. त्यांचा निर्णय झाल्यावर तो निर्णय राज्याच्या समितीकडे येईल. त्यानंतर त्यावर निर्णय होईल.⁠ ⁠पक्षात कोणीही येत असेल तर, पक्ष संघटना वाढण्यासाठी कोणी येत असेल, विकसीत भारत संकल्पनेसाठी कोणी येत असेल, तर त्यांचे स्वागतच आहे.''

'होय, मी भाजपात जाणार', एकनाथ खडसेंची होणार भाजपमध्ये घरवापसी
अकोल्यात काँग्रेसकडून वंचितला धक्का, पंचायत समितीच्या सदस्याचा राजीनामा; पक्षातून हकालपट्टी केल्याचा वंचितचा दावा

याचबद्दल बोलताना भाजप नेते आणि खासदार अशोक चव्हाण म्हणाले की, ''जर तर वर मी बोलणार नाही. पण जे जे लोक भाजपसाठी उपयुक्त ठरतील, त्यांचे स्वागत आहे. युद्ध सुरू आहे. युद्धात आत्मविश्वासानं जावं लागेल.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com