Arvind Kejriwal Saam Tv
देश विदेश

Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची ईडी कोठडी संपणार, आज कोर्टाकडून दिलासा मिळणार का?

Arvind Kejriwal Latest News in Marathi : दिल्ली मद्य विक्री धोरण प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची ईडी कोठडी आज सोमवारी संपणार आहे. त्यामुळे केजरीवाल यांना पुन्हा राऊज एव्हीन्यू कोर्टाच्या पीएमएलए कोर्टात हजर करणार आहे.

Vishal Gangurde

Arvind Kejriwal News :

दिल्ली मद्य विक्री धोरण प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची ईडी कोठडी आज सोमवारी संपणार आहे. त्यामुळे केजरीवाल यांना पुन्हा राऊज एव्हीन्यू कोर्टाच्या पीएमएलए कोर्टात हजर करणार आहे. आज कोर्टात साडे अकरा वाजता या प्रकरणाची सुनावणी होणार असून त्यांना दिलासा मिळणार का, हे पाहावे लागणार आहे.

मद्य विक्री धोरण प्रकरणी पीएमएलए कोर्टाने अरविंद केजरीवाल यांची २८ मार्चला चार दिवसांची ईडी कोठडी वाढवली होती. केजरीवाल यांना २१ मार्चला अटक केली होती. त्यानंतर केजरीवाल यांना ईडीने २२ मार्चला कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यानंतर कोर्टाने केजरीवाल यांना सहा दिवसांसाठी ईडी कोठडीत पाठवलं होतं.

ईडीचा आरोप काय?

ईडीने आरोप केला होता की, मद्य विक्री धोरणात अरविंद केजरीवाल यांनी दक्षिणेतील मद्य व्यापाऱ्यांकडून १०० कोटी रुपयांची लाच मागितली होती. या पैशांचा वापर गोवा आणि पंजाब विधानसभेत खर्च केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ईडीने अटक केल्यानंतर केजरीवाल यांनी हायकोर्टात कस्टडीला आव्हान दिलं होतं. मद्य धोरणातील इतर प्रकरणावर तीन एप्रिलला सुनावणी होणार आहे. या प्रकरणी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि राज्यसभा सद्यस्य संजय सिंह यांनाही आधीच तुरुंगात आहे.

'आप'चा आणखी एक मंत्री अडचणीत

दरम्यान, मद्य विक्री धोरण प्रकरणात रविवारी आम आदमी पक्षाच्या आणखी एका मंत्र्यांला ईडीने समन्स पाठवलं आहे. ईडीने आता कैलाश गहलोत यांना समन्स पाठवलं आहे. या प्रकरणात आता गहलोत यांना चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pandharpur: आधी बायकोची मुलांसोबत आत्महत्या, नवऱ्यानंही उचललं टोकाचं पाऊल; पंढरपूर हादरलं

रश्मिका मंदानाची लहान बहीण आहे तरी कोण? काय करते?

Maharashtra Live News Update : संतोष देशमुख हत्या प्रकरणाला सुरूवात, उज्वल निकम न्यायालयात दाखल

Dindyachi Bhaji Recipe : दींडाची गावरान चमचमीत भाजी बनवण्याची पारंपारिक पद्धत जाणून घ्या

Rabies Symptoms: रेबीज म्हणजे काय आणि तो का होतो? सुरुवातीची लक्षणे कोणती?

SCROLL FOR NEXT