Arvind Kejriwal
Arvind Kejriwal  Saam Digital
देश विदेश

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांना पुन्हा झटका; न्यायालयाने सुनावली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Sandeep Gawade

https://youtu.be/iG3SijuCELYदिल्ली मद्य घोटाळाप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. दिवसेंदिवस अडचणींमध्ये भर पडत आहे. आज राऊस अव्हेन्यू न्यायालयात त्यांना हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने केजरीवाल यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने सीबीआयच्या न्यायालयीन कोठडीची मागणी करणाऱ्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता.

सीबीआयने अरविंद केजरीवाल यांना २६ जून रोजी अटक केली होती. सीबीआयने राऊस एव्हेन्यू न्यायालयात केजरीवाल यांच्या चौकशीसाठी 5 दिवसांची कोठडी मागीतली होती. मात्र न्यायालयाने त्यांना ३ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली होती, त्यातून आज सुटका होणार होती. केजरीवाल यांना ट्रायल कोर्टाने 20 जून रोजी दारू घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात जामीन मंजूर केला होता. कनिष्ठ न्यायालयाच्या या निर्णयाला अंमलबजावणी संचालनालयाने दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. उच्च न्यायालयाने ट्रायल कोर्टाच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती दिली.

सुनावणीदरम्यान केजरीवाल यांच्या वकिलाने न्यायालयासमोर दोन अर्ज सादर केले होते. न्यायाधीश जोपर्यंत आदेश देत नाहीत तोपर्यंत केजरीवाल यांना 10 ते 15 मिनिटे कुटुंबाला भेटण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी यापूर्वी करण्यात आली होती. तर ईडी प्रकरणात अटक झाल्यानंतर केजरीवाल यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले होते, तेव्हा त्यांना वैद्यकीय कारणास्तव जी सूट मिळत होती ती भविष्यातही सुरू ठेवावी अशी मागणी करण्यात आली. न्यायालयाने दोन्ही मागण्या मान्य केल्या आहेत.

सीबीआयने न्यायालयात बाजू मांडताना, केजरीवाल यांनी या प्रकरणात आधीच तुरुंगात असलेले आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते मनीष सिसोदिया यांच्यावर संपूर्ण प्रकरणाचा ठपका ठेवला आहे. केजरीवाल यांनी अबकारी धोरणाबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगितलंअसल्याचं तपास यंत्रणांनी म्हटलं आहे. सीबीआयचे या आरोपांचं खंडन करत, मी सिसोदिया यांच्यावर कोणताही दोष ठेवला नाही, मी देखील निर्दोष आहे आणि सोसादियाही निर्दोष असल्याचं केजरीवाल म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Pawar-Rahul Gandhi: पवारांचा राहुल गांधींना वारीचं निमंत्रण...

Zika Virus News: सावधान! राज्याला झिकाचा विळखा

Uddhav Thackeray Milind Narvekar: Special Report: नार्वेकरांना निवडून आणण्यासाठी रणनिती?

Crop Insurance: पीक विमा भरताना आधार कार्ड व सातबारा उतारा यावरील नावात थोडासा बदल असेल तरी विमा अर्ज स्वीकृत होतील

Ladki Bahin Yojana News: सर्व्हर डाऊन, लाडकी बहीण हतबल!

SCROLL FOR NEXT