Arvind Kejariwal Arrest ED
Arvind Kejariwal Arrest ED Saam Digital
देश विदेश

Arvind Kejariwal Arrest ED : मुख्यमंत्र्यांपासून राज्यसभा खासदारांपर्यंत... कोण आहेत दिल्ली मद्य घोटाळ्यात अटक झालेले १६ जण?

Sandeep Gawade

Arvind Kejariwal Arrest ED

दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर देशाचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आतापर्यंत या प्रकरणात १६ जणांना अटक करण्यात आली असून आम आदमी पक्षाचे महत्त्वाचे नेते आणि मंत्र्यांचा समावेश आहे. याआधी तत्कालीन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, राज्यसभा खासदार संजय सिंह आणि माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची मुलगी के कविता यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

नोव्हेंबर 2021 मध्ये दिल्ली सरकारने नवीन उत्पादन शुल्क धोरण जाहीर केलं. या धोरणाद्वारे राजधानीत 32 झोन तयार करण्यात आले असून प्रत्येक झोनमध्ये 27 दुकाने सुरू करण्याची योजना होती. या धोरणाद्वारे दिल्लीत 849 दारूची दुकाने उघडली जाणार होती. याशिवाय सर्व शासकीय कंत्राटे बंद करून ही दुकाने खासगी करण्यात आली. यातून दिल्ली सरकारला 3500 कोटींहून अधिकचा फायदा होणार असल्याचे सांगण्यात येत होतं.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोणाला कोणाल झाली अटक?

1. विजय नायर (AAP कम्युनिकेशन हेड)

2. अभिषेक बोइनपल्ली

3. समीर महेंद्रू

4. पी सरथ चंद्रा

5. बिनोय बाबू

6. अमित अरोड़ा

7. गौतम मल्होत्रा

8. राघव मंगुटा

9. राजेश जोशी

10. अमन ढाल

11. अरुण पिल्लई

12. मनीष सिसोदिया

13. दिनेश अरोड़ा

14. संजय सिंह

15. के. कविता

16. अरविंद केजरीवाल

2022 पासून उटकेचं सत्र

दिल्लीचे मुख्य सचिवांनी या नवीन धोरणाविरोधात अनियमितता असल्याचा आरोप करत माहिती दिली होती. त्यानंतर दिल्लीच्या उपराज्यपालांनी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली. तपास यंत्रणांकडून सुरू असलेल्या तपासात अटकेची प्रक्रिया सप्टेंबर 2022 पासूनच सुरू झाली.सीबीआयने सप्टेंबर २०२२ मध्ये आम आदमी पार्टीचे संपर्क प्रमुख आणि मद्य धोरण विजय नायर यांना अटक केली. नायर हे केजरीवाल यांच्या अत्यंत जवळचे असल्याचे सांगितले जाते. ते एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचे सीईओही राहिले आहेत.

यानंतर हैदराबादचे व्यापारी अभिषेक बोईनपल्ली यांना अटक करण्यात आली. 18 महिने कोठडीत राहिल्यानंतर सुप्रीम कोर्टाने अलीकडेच त्यांना 5 आठवड्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला आहे आणि ईडी अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहण्याचे निर्देशही दिले आहेत. त्यानंतर दारू व्यावसायिक समीर महेंद्रू यालाही अटक करण्यात आली. देशातील बड्या उद्योगपतींमध्ये त्यांची गणना होते. ते इंडो स्पिरिट कंपनीचे डीजी आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tata आणि Citroen च्या दोन नवीन कार ऑगस्टमध्ये होणार लॉन्च, जाणून घ्या फीचर्स

405 लिटरची बूट स्पेस, 19 Kmpl मायलेज, जबरदस्त आहे Renault ची ही 5 Seater Car

Desi Jugad Viral Video: जबरदस्त देसी जुगाड! कारमध्येच लावली ऊसाच्या रसाची मशीन, VIDEO ची होतेय चर्चा

Viral Video: स्केटिंग करताना हिरोगिरी करणं पडलं महागात, तरुणाचे झाले असे हाल; थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

kalyan Crime News : लग्नाला दिलेला नकार पोराला पचला नाही, रागाच्या भरात नको ते करून बसला!

SCROLL FOR NEXT