PM Narendra Modi saam tv
देश विदेश

Cabinet Meeting Big Decision: विश्वकर्मा योजना आणि रेल्वेच्या 7 प्रोजेक्टला मंजुरी, कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले महत्वाचे निर्णय

Priya More

Cabinet Meeting: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची (Cabinet Meeting) बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीमध्ये मोदी सरकारने देशातील जनतेसाठी उपयुक्त असणारे अनेक निर्णय घेतले आहे.

या माध्यमातून मोदी सरकारने (Modi Government) जनतेला गिफ्ट दिले आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Union Minister Anurag Thakur) यांनी या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधत माहिती दिली.

केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले महत्त्वाचे निर्णय -

- मोदी सरकारने पीएम ई-बस सेवेला (PM E Bus Seva) मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत देशभरात १० हजार नवीन इलेक्ट्रिक बस धावणार आहेत.

- मंत्रिमंडळाने 13,000 कोटी रुपयांच्या विश्वकर्मा योजनेलाही मंजुरी दिली आहे. या योजनेमध्ये पारंपारिक व्यवसायांशी संबंधित लोकांना स्वस्त दरात २ लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळेल.

- पारंपारिक व्यवसायाशी संबंधित असेलल्या 30 लाख कुटुंबांना विश्वकर्मा योजनेचा लाभ होणार आहे.

- केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत रेल्वेच्या 7 प्रमुख विभागांसाठी या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. एकूण 32500 कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे.

- रेल्वे प्रकल्पांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, तेलंगणा, महाराष्ट्र, झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांना मोठा फायदा होणार आहे.

- गोरखपूर ते वाल्मिकी नगर या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचा करार झाला असून त्यासाठी 1269 कोटी रुपये खर्च येणार आहेत.

- याशिवाय गंडक नदीवर एक किलोमीटर लांबीचा पूलही बांधण्यात येणार असून, त्याचा फायदा बिहार, उत्तर प्रदेश तसेच नेपाळला होणार आहे.

- स्वानिधी योजनेंतर्गत 70 हजार कोटींची मदत झाली असून 42 लाख लोकांना त्याचा लाभ झाला आहे.

- डिजिटल इंडियाच्या विस्तारासाठी 14,903 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आयटी व्यावसायिकांचे कौशल्य सुधारले जाईल.

- इन्फॉर्मेशन सिक्योरिटीसाठी 2 लाख 65 हजार लोक कुशल होतील. उमंगमध्ये 540 सेवा आणि 9 सुपर कॉम्प्युटर जोडले जातील.

- स्पीच अॅपचा विस्तार केला जाईल. एमएसएमईसाठी डीजी लॉकर बनवले जाईल.

- टियर 2 आणि 3 शहरांमध्ये 1200 स्टार्टअपला सपोर्ट केले जाईल. सायबर सुरक्षेसाठी अनेक साधनांचा विस्तार केला जाईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT