Sharad Pawar on Pm Modi
Sharad Pawar on Pm ModiSaam Tv

Sharad Pawar News: 'मोदींनी फडणवीसांचं मार्गदर्शन घेतलं, म्हणून म्हणाले पुन्हा येईन', शरद पवारांची शेलक्या भाषेत टीका...

Sharad Pawar on Pm Modi: 'मोदींनी फडणवीसांचं मार्गदर्शन घेतलं, म्हणून म्हणाले पुन्हा येईन', शरद पवारांची शेलक्या भाषेत टीका...
Published on

Sharad Pawar on Pm Modi: ''मणिपूरची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. ईशान्य भारतात ज्या गोष्टी घडत आहेत आणि ज्या घडवल्या जात आहेत, त्या देशाच्या ऐक्याच्या दृष्टितीने अत्यंत घातक आहेत. त्यांचं उदाहरण मणिपूर द्यायचं झालं, तर त्या ठिकाणी दोन समाजात मोठं अनंतर निर्माण झालं आहे.', असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते असं म्हणाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करत पवार म्हणाले की, ''या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असताना काल 15 ऑगस्टच्या भाषणात पंतप्रधान मोदी या सगळ्या गोष्टींचा उल्लेख करतील असं वाटलं होतं. मात्र याचा उल्लेख करण्या ऐवजी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं मार्गदर्शन घेतलेलं दिसतंय. त्या दिवशी त्यांनी सांगितलं, मी पुन्हा येईल. देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईल असं सांगितलं होतं, ते आले. मात्र त्या पदावर आले नाहीत. त्याच्या खालच्या पदावर आले. आता हा आदर्शन घेऊन त्यांनी आता कोणत्या पदावर येण्याचा निश्चय केलाय, हे मी आता सांगू शकता नाही.''

Sharad Pawar on Pm Modi
Maharashtra Politics: शिंदे गटाचे १२ आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात? भेट घेण्यासाठी मातोश्रीवर फोन केला पण...

भाजपची भूमिक समाजात तेढ निर्माण करणार: शरद पवार

मोदींचे सरकारवर हल्लाबोल करत शरद पवार म्हणाले की, ''आज देशांची सत्ता ज्यांच्या हातामध्ये आहे. त्या पक्षाची भूमिका देशाच्या सगळ्या समाजात एक वाक्यता ठेवण्यासाठी अपेक्षित होती. त्या ऐवजी समाज, धर्मामध्ये आणि विविध भाषिकांमध्ये विभाजन कसं होईल, कटुता कशी वाढेल, या संदर्भाची भूमिका ते घेत आहेत.''  (Latest Marathi News)

ते म्हणाले, ''त्यासाठीच देशपातळीवर आम्ही दोन सभा घेतल्या. एक बिहारमध्ये आणि दुसरी कर्नाटकात. त्या सभेत जवळपास सहा राज्याचे मुख्यमंत्री आणि महत्वाच्या राष्ट्रीय पक्षाचे नेते उपस्थित होते. या संयुक्त सभेतमधून आम्ही तिथे एक निर्णय घेतला आणि एकत्रित येत याला 'इंडिया' आघाडी, असं नाव दिलं.''

Sharad Pawar on Pm Modi
Sharad Pawar Supporter: साहेब नाही तर लग्न नाही! शरद पवारांच्या निष्ठावंत कार्यकर्त्याने २ वेळा मोडले लग्न, स्वत:च सांगितला भन्नाट किस्सा

शरद पवार पुढे म्हणाले की, 31 ऑगस्ट रोजी इंडिया आघाडीची बैठक मुंबईत घेतली जाईल. दुसऱ्या दिवशी 1 सप्टेंबर रोजी याची सभाही घेतली जाईल. या बैठकीत इथून पुढील काळात एकत्रितपणे आपण (इंडिया आघाडी) हे जे मोदी सरकार आहे, त्यांच्याविरुद्ध एक जनमत तयार करू शकतो. तसेच त्यांच्याविरुद्ध पर्याय कसा देऊ शकतो, याबद्दलचा विचार करणार आहोत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com